Video : BCCI चा मोठा निर्णय ! रणजी मधील नॉकआउट सामन्यात वापरणार ‘ही’ पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने स्पष्ट केले आहे कि, रणजी नॉकआउट सामन्यांमध्ये यापुढे लिमिटेड डीआरएसचा वापर करण्यात येणार आहे. मात्र या सामन्यांत हॉक-आय (Hawk-Eye) आणि अल्ट्राएज पद्धतीचा अवलंब करण्यात येणार नाही. या दोन पद्धतीचा अवलंब आंतरराष्ट्रीय सामन्यांत करण्यात येतो. रणजीच्या मागील मोसमात खराब अंपायरिंगच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. सौराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान खेळवण्यात आलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा याला बाद असताना नाबाद देण्यात आले.

https://twitter.com/NaaginDance/status/1089430447921209344

यानंतर आता बीसीसीआयचे महाप्रबंधक सबा करीम यांनी लिमिटेड डीआरएसचा वापर करण्याविषयी समर्थन दर्शवले आहे. त्यांनी म्हटले कि, मागील काही वर्षांपासून नॉकआउट सामन्यांत अंपायरकडून काही प्रमाणात चुका झाल्या आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील क्रिकेटवर नजर ठेवणाऱ्या प्रशासकीय समितीने देखील मागील वर्षी लिमिटेड डीआरएसला हिरवा झेंडा दाखवला होता. २०१९-२० मधील रणजी मोसम यावर्षी डिसेंबर मध्ये सुरु होणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षांपासून डीआरएसचा विरोध करत होते. मात्र यावर्षीपासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये आता डीआरएस वापरण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा बीसीसीआयने वापर केला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त