‘बीसीसीआय’ घेणार ‘राहुल द्रविड’ बाबत महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने टीका केली होती आणि म्हणाला होता की, देवा भारतीय क्रिकेटला वाचवं, याला कारण होत ते म्हणजे भारताची वॉल समजल्या जाणाऱ्या क्रिकेटपटू राहुल द्रविडने परस्पर हितसंबंध जपल्याचा आक्षेप बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी द्रविडला नोटीस देखील पाठवली होती. परंतू आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी द्रविडची बाजू उचलून धरली आहे यामुळे द्रविडला सध्या दिलासा मिळाला आहे.

द्रविड सध्या राष्ट्रीय अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीच्या प्रमुख पदी काम करत आहे, परंतू बीसीसीआयच्या मंडळाने शिस्तपालन अधिकऱ्यांने राहुलवर हितसंबंध जपल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य संजीव गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी द्रविडला नोटीस पाठवली होती.

गुप्ता यांनी नुकतीच आपल्या तक्रारीत म्हणले होते, द्रविड यांना ज्या परिस्थितीत एनसीएच्या ऑपरेशन्स हेड नियुक्त केले त्यावेळी ते इंडिया सीमेंट्सचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि या कंपनीकडे आयपीएल टीम चेन्नई सुपर किंगचा मालकी आधिकार आहे.

अधिकाऱ्यांने सांगितले की, द्रविड यांना जैन यांनी मागील आठवड्यात नोटीस पाठवली होती आणि दोन आठवड्यात स्पष्टीकरण मागवले होते. एमपीसीएचे अजीवन सदस्य गुप्ता यांनी पहिल्यांदा देखील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीवीएस. लक्ष्मण यांच्या विरोधात देखील हित्यांच्या जपल्याच्या मुद्यावर तक्रार दाखल केली होती.

आरोग्यविषयक वृत्त