बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनकडे आहे इतकी संपत्ती ? आज साजरा करत आहे वाढदिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अगदी कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून स्थान मिळवलेला कार्तिक आर्यन (kartik aryan) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिक आज आपला ३० वा वाढदिवस (30th birthday) साजरा करत आहे. तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे चित्रपटांचीदेखील रीघ लागली असून, पैशांची कमतरतादेखील त्याच्याकडे नाही.

कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘प्यार का पंचनामा’ (pyar ka panchnama )मध्ये दिलेल्या त्याच्या मोनोलॉगने त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय केले होते. त्यानंतर त्याच्या अनेक सिनेमांनी यश मिळवत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला मिळवला होता. यानंतर कार्तिकचा ‘सोनू के टिटू की स्विटी’ (sonu ke titu ke sweety ) हा सिनेमाही चांगलाच गाजला होता. या सिनेमाने १०० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली होती आणि सोबतच कार्तिक आर्यन व नुसरत भरूचा यांच्या करिअरनेही भरारी घेतली होती.

अलीकडेच त्याचा ‘पती, पत्नी और वो’ (pati patni aur woh) हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. त्याच्याकडे अनेक सिनेमाच्या ऑफर आहेत आणि तो यातून चांगलं मानधनही घेऊ लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या कार्तिक आर्यनकडे आता ४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. केवळ २०१९ मध्ये कार्तिकने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. कार्तिकने त्याच्या आईला ४० लाख रुपयांची मिनी कूपर कार गिफ्ट केली होती.

दरम्यान, कार्तिक आर्यन याने नुकतेच सारा अली खानसोबत ‘लव्ह आज कल’मध्ये काम केले होते. आता तो कियारा अडवाणीसोबत ‘भुल भुलैया २’ (bhul bhullaiya 2) आणि जान्हवी कपूरसोबत ‘दोस्ताना 2’ (dostana २) मध्ये काम करणार आहे. दोन्ही सिनेमांचे शूटिंग सुरू असून, पुढील वर्षी हे सिनेमे रिलीज होण्याची शक्यता आहे.

You might also like