home page top 1

सावधान ! तुमच्या ‘या’ सवयी संपवू शकतात तुमचे ‘वैवाहिक’ जीवन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजकाल तरुणांच्या काही चुकीच्या सवयींमुळे ते आपली सेक्स क्षमता वेळेच्या आधीच कमी होताना दिसत आहे. त्यामुळे काहींना लाजिरवाणे झाल्यासारखेही वाटते. यासाठी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळीच काही चुकीच्या सवयींना आळा घालणे गरजेचे आहे. कारण त्या सवयींमुळे तुमची सेक्स लाईफ धोक्यात येऊ शकते. चला आपण त्या सर्व सवयींबद्दल जाणून घेऊयात. तुम्हीही या सवयींची काळजी घ्या आणि वेळीच आपल्या सेक्स लाईफला वाचवा.

1) पर्सनल हायजीन
कोणालाही किमान हे सांगण्याची गरज नसावी की, पर्सनल हायजीनची काळजी घेणं किती गरजेचं आहे. असे असतानाही लोकांना बऱ्याचदा अशा पार्टनर्सना झेलावे लागते जे साफ सफाईकडे लक्ष देत नाहीत. शिवाय त्यांच्या शरीराची दुर्गंधीही येत असते. ही एक अशी वाईट सवय आहे जी पार्टनरच्या उत्तेजना संपुष्टात आणू शकते.

2) अल्कोहोलचे सेवन
पार्टनरसोबत कधी तरी वाईनची एक बाटली शेअर करण्यास हरकत नाही. परंतु जर तुम्ही नेहमीच बाटल्यावर बाटल्या दारू पीत असाल तर आपल्या या सवयीमुळे फक्त तुमचे स्वास्थ्यच नाही तर तुमची सेक्स लाईफही तुम्ही खराब करत आहात हे लक्षात ठेवायला हवे. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने सेक्स ड्राईवमध्ये कमी येते.

3) सोशल मीडिया अ‍ॅडिक्शन
आजकाल लोक जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. यात वाईट असं काहीच नाही. परंतु जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाईन आणि सोशल मीडियावर घालवत असाल, खासकरून जेव्हा तुम्ही पार्टनरच्या समोर असता आणि असे असूनही तुम्ही पार्टनरकडे लक्ष देत नसता तेव्हा मात्र याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Loading...
You might also like