तुम्ही देखील LIC पॉलिसी घेणार असाल तर ‘या’ बाबतीत व्हा सावध ! अन्यथा बुडतील सर्व पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही पॉलिसी घेण्याचा विचार करत आहात का ?, LIC पॉलिसी (Life Insurance Corporation) खरेदी केली आहे. याबाबत तुम्हाला जर या पॉलिसीबाबत चुकीची माहिती देणारे फोन येत असतील तर सावध व्हा. या फोन कॉल्सवरून ग्राहंकाना चुकीची माहिती दिली जाते. हे भामटे ग्राहकांना बोलण्यात गुंतवून पैसे लुबाडतात. अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून LIC कडूनच ग्राहकांना सावध करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.

अशा फोन कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा LIC ने ट्विटरवरून ग्राहकांना दिला आहे. हे भामटे पॉलिसीबाबत चुकीची माहिती देत फसवणूक करतात. शिवाय ते LIC चे अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात. पॉलिसीची रक्कम त्वरित देण्याचं सांगत अनेकांती फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

LIC ने फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेअर केल्या काही टिप्स
– जर तुम्हाला पॉलिसीबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर www.licindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच माहिती मिळवा. कोणत्याही क्रमांकावर फोन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.

– शिवाय तुम्हाला एखादा फसवा फोन कॉल आलाच तर जवळच्या पोलीस ठाण्यात कॉल करा. [email protected] या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट देखील पाठवू शकता.

– अशाप्रकारे फोन कॉल आल्यास त्यावर दीर्घकाळ बातचीत करू नका तसंच कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

– या फोन कॉलवर पॉलिसी सरेंडरविषयीही माहिती देऊ नका. पॉलिसी डिटेल्स देखील अशा प्रकारे कोणत्याही फोन कॉलवर शेअर करू नका. ही माहिती मिळवण्यासाठी एलआयसी ग्राहकांना फोन करत नाही हे लक्षात घ्या.

रहा सावधान बनावट फोन कॉलपासून
एलआयसीने ग्राहकांना सल्ला दिला की त्यांनी त्यांच्या पॉलिसीला LIC च्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्टर करावे आणि तिथूनच योग्य माहिती प्राप्त करावी. LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कंपनी कोणत्याही ग्राहकाला पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. ग्राहकांनी हे फोन कॉल्स न घेण्याचा सल्ला एलआयसीने दिली आहे.