शूsss लपून-छपून पॉर्न पाहताय ? त्यांना माहितीय ते तुमच्यावर लक्ष ठेऊन आहेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पॉर्न साईट पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पॉर्न साईट जरी बॅन असल्या तरी छुप्या प्रकारे ते पाहणाऱ्यांची संख्या देखील घटत नाही. मोबाईल मध्ये तर इंटरनेट आणि सोशल नेट्वर्किंग आल्यापासून या साईटसचा बाजार वेगाने सुरु आहे. तितक्याच मोठ्या प्रमाणात पॉर्न व्हिडीओ शेअर देखील केले जातात. पण तुम्हला माहीत आहे का या साईट्स द्वारे तुमची खाजगी माहिती चोरली जाते. तुमच्या प्रत्येक ऑनलाईन केल्या जाणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवली जाते.

तुम्ही काय करता, काय पाहता हे त्यांना माहितीय
काही वेबसाईट मालवेअरचा वापर करून युजरचे फोटो, टेक्स्ट आदी गोळा करत आहेत. क्वार्टझ् ने दिलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. शिवाय एखादा पॉर्न व्हिडिओ पाहत असताना तो कुठे कुठे थांबवला गेला, कोणता भाग पुन्हा पुन्हा पाहिला गेला, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात आदींची माहिती गोळा करतात. यासाठी बोट्सचाही वापर केला जातो. हा प्रकार अन्य व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाईटकडून केला जात नाही. म्हणजेच अॅडल्ट वेबसाईट युजरची प्रत्येक हालचाल टिपत असतात.

असे पाडले जाते मोहात
ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये युजरचा डेटा हा एक मलईचा प्रकार बनला आहे. यामुळे फेसबुकसारख्या सोशल मिडियालाही हा डेटा विक्रीतून मोठा नफा कमवण्याचा मोह आवरता आलेला नाही. या डेटामध्ये नाव, फोटो, पत्ता, आवडत्या गोष्टी, स्वभाव आदी बाबी अन्य कंपन्यांना विकण्यात येतात. याचा वापर करून जाहीरात कंपन्या तुम्हाला लक्ष्य करतात. मात्र, पॉर्न वेबसाईट युजरची खासगी माहितीही चोरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. हे खूपच धोकादायक आहे.

आर्टीफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर

–आधी पॉर्न वेबसाईट युजरचा आयपी अ‍ॅड्रेस गोळा केला जातो.

–त्यामुळे तुम्ही कोणत्या साईटस पहिल्या याची माहिती मिळते
— यापूर्वी सर्च केलेल्या गोष्टी देखील हॅकरला  समजतात
— त्यावरून तुमच्या आवडी निवडीची माहिती मिळवली जाते (नाव ,पत्ता,फोटो ,स्वभाव )
–तुम्ही अधिक यात कसे गुंतून राहाल याचा विचार केला जातो
— आता तुमची खाजगी  माहिती चोरीला गेलेली असते
त्यामुळे वेळीच सावधानता बाळगा. पॉर्न साईटस पासून चार हात लांबच रहा