सावधान ! १०० आणि ५०० च्या बनावट नोटा बाजारात 

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन – मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा पुन्हा चलनात आल्याचे निदर्शनात आले आहे. काही व्यापाऱ्यांकडे आलेल्या नोटांच्या बंडलामध्ये या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यामुळे सावधान, व्यवहारात प्रत्येक नोट तपासून घ्या, नसता आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

नोटा बंदीच्या अगोदर बाजारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला होता. त्यावेळी बाजारात पाचशे रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. त्यामुळे सर्वाधिक रोख व्यवहार या नोटांमधून होत होते. कोणालाही पाचशेची नोट दिली तर ते खालून वरुन तपासून घेत होत.. बँकांमध्ये तर त्या नोटा मशीनद्वारे चेक केल्यानंतरच घेतल्या जात होत्या. काही ठिकाणी पाचशेची नोट असेल तर त्याचे नंबर लिहून देण्याची सक्ती केली जात होती. नोटा बंदीमुळे त्या सर्व नोटा रद्द झाल्यावर रिझर्व्ह बँकेने नव्या पाचशेच्या नोटा बाजारात आणल्या. पण, नव्या नोटा पहिल्यापासूनच वादात अडकलेल्या दिसत आहे. अनेकदा छपाईत त्यावरील रंग फिसकलेले दिसून येतात.

अनेक शहरातून आता बनावट नोटा सापडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. औरंगपुनव्यातील एका किरकोळ व्यापाऱ्यांकडे नोटांच्या बंडलात १०० रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळून आल्या. तसेच मोंढ्यातील एका व्यापाऱ्यांकडेही ग्राहकाने बंडलमध्ये एक ५०० रुपयांची बनावट नोट दिली. रात्री हिशोब करताना त्या व्यापाऱ्याला ही नोट आढळून आली. एवढेच नव्हे तर एका होलसेलरला   बंडलात ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या व्यापाऱ्यांनीही माहिती अन्य व्यापाऱ्यांना दिल्याने हे लक्षात आले. या नोटांकडे बघितले असता मुळ नोटांचे रंगीत झेरॉक्स काढल्याचे लगेच लक्षात घेते. बँकेत गेल्यावर या बनावट नोटा नष्ट केल्या जातील, आर्थिक नुकसान होईल, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. हे टाळण्यासाठी मग काही जण बनावट नोटा फाडून नष्ट करीत आहेत किंवा काही जण नोटांच्या बंडलात टाकून दुस देत आहेत. मात्र, अशा नोटा बँकेत जाणार नाहीत याची खबरदारीही घेतली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अनेक व्यापारी सध्या ५०० व २ हजार रुपयांच्या नोटा तपासूनच घेत आहेत. आता १०० रुपयांच्या बनावट नोटा येत असल्याने त्याही तपासून घेऊ लागले आहेत. बाजारपेठेत बनावट नोटा थोड्याफार प्रमाणात आढळून येऊ लागल्यामुळे सध्या व्यापारी वर्गात बनावट नोटांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशा किती बनावट नोटा शहरातील अर्थव्यवस्थेत आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. या बनावट नोटांबद्दल पोलिसांत कोणी माहिती देत नसल्याने बनावट नोटा तयार करणाऱ्या गुन्हेगारांचे फावत आहे.
बनावट नोटांसह आरोपी पकडल्याच्या शहरातील काही घटना घडल्या आहेत.

शहरात दोन हजारांच्या बनावट नोटा चालवणारे रॅकेट २३ जुलै २०१७ ला उघडकीस आले होते. तेलंगणातून बनावट नोटा घेऊन शहरात आलेल्या दोघांना २० डिसेंबर २०१७  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. सिडकोतील कॅनॉट प्लेस परिसरात फिरणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक केली होती. त्यांच्यांकडून दीड लाखाच्या ३०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज, आई-वडिलांना जिवे माहण्याची धमकी