पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु नये, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड, पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, प्रा.डॉ. संजय तांबट, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
अश्विनी पाटील म्हणाल्या, महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन दक्ष असून संकटसमयी महिलांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तात्काळ मदत पोहचू शकते. आपणा सर्वांची फसवणूक मॅट्रीमोनिअल साइट, फेसबुक, व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम माध्यमातून होते. यामध्ये शाळकरी मुलींपासून ते प्रौढ महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी महिलांनी दक्ष राहण्याबरोबरच मनाने खंबीर राहणे गरजेचे आहे. आपल्या हातून काही गंभीर चूक घडली आहे असे वाटून आपल्याकडून ती लपविली जाते. त्यातून अनेक चुका आपण करत जातो. त्यामुळे वेळीच आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन याची माहिती दिल्यास तसेच पोलिसांशी संपर्क साधल्यास या गोष्टींना वेळीच चाप बसविणे शक्य होते.
पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, प्रा.डॉ. संजय तांबट, माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मोहन राठोड यांनी तर वृषाली पाटील यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- जाणून घ्या ; ‘व्हिटॅमिन सी’चे आरोग्याला होणारे ‘हे’ ७ फायदे !
- ‘या’ ५ स्टेपमध्ये करा हा व्यायाम, कमी होईल लठ्ठपणा आणि पोटाचा घेर
- तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
- ‘मायग्रेन’चा त्रास होतोय ? ‘या’ ६ प्रकारे घ्या काळजी
- शिंकताना डोळे बंद का होतात ? शिंक का येते ? ‘ही’ आहेत २ कारणे
- …म्हणून खावी भेंडीची भाजी, ‘हे’ आहेत ८ आरोग्यदायी फायदे
- दातांच्या आरोग्याबाबत ‘या’ ५ गैरसमजांवर ठेवू नका विश्वास