सावधान ! लशीसाठी ‘फेक वेबसाईट’वरून करू नका रजिस्ट्रेशन, बसेल आर्थिक फटका; सरकारकडून दिलीये माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसवरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण आजपासून सुरु झाले आहे. यामध्ये आता 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि 45 पेक्षा जास्त वय पण गंभीर आजार असलेल्या लोकांना कोरोनावरील लस दिली जात आहे. पण त्यापूर्वीच म्हणजे शनिवारपासूनच फेक वेबसाईटचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोरोनावरील लस घेण्यासाठी अनेकांनी फेक वेबसाईटवर प्री-रजिस्ट्रेशनही केले आहे. त्यामुळे आता त्यांना फसवणुकीची भीती वाटत आहे. आता त्या वेबसाईटवरून स्वत:चा रजिस्ट्रेशन काढण्याचा पर्याय शोधत आहेत. मात्र, असा कोणताही पर्याय तिथं उपलब्ध नाही. त्यानंतर आता ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (PIB) फॅक्ट चेक टीमने सूचना दिल्या आहेत. तुम्ही अशा कोणत्याही वेबसाईटवरून नोंदणी करू नका. ते पूर्णपणे फेक आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता, असेही सांगितले आहे.

PIB ने म्हटले वेबसाईट फेक
PIB च्या टीमने माहिती घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले, की https://selfregistration.preprod.co-vin.in ही वेबसाईट CoWIN वेबसाईटसारखीच दिसते. यामाध्यमातून युजर्सची माहिती घेऊन नोंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही फेक वेबसाईट आहे. त्यामुळे लसीकरणासंबंधी अधिकृत माहिती घेण्यासाठी @MoHFW_INDIA च्या ट्विटरवर जावे. तसेच रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही ऍप नाही, हेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.