सावधान ! तुम्ही केमिकलयुक्त आंबे तर खात नाही ना ? ही घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळा आला की प्रेत्येक घरात हमखास आंबे आणले जातात. उन्हाळ्याचे दिवस , सुट्ट्या आणि खास आंब्यांचा सिझन म्हणजे बच्चे कंपनीसाठी मोठी पर्वणीच असते. वर्षातून एकदा येणारा आंबा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. पण सध्या बाजरात येणारे आंबे हे नैसर्गिक रित्या पिकवलेले आहेत का?

हे नक्की तपासून घ्या कारण रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. या रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळे शरीरावर घातक परिणाम होतो. कॅल्शिअम काराबाईड किंवा ऍसिटिलीन गॅस या रसायनांचा मारा आंब्यांवर केलेला असतो. या केमिकलच्या वापरावर बंदी असली तरी सर्रास याचा वापर होताना दिसतो.

कसा ओळखावा केमिकलयुक्त आंबा

–या आंब्यांना उग्र वास येतो. नैसर्गिक वास नसतो

–आंब्याचा काही भाग पांढरा असतो. असे असल्यास त्यावर कार्बाइडचा मारा केलेला असतो.

–आंब्याची चवही वेगळीच लागते.

–असे आंबे बाहेरून पिवळे दिसत असले तरी आतून अर्धवट कच्चे असतात.

–पिवळ्या रंगाच्या सालीवर हिरव्या रंगाचे चट्टे असतात.

–असा आंबा रसाळ नसतो.

केमिकलयुक्त आंब्यांचा काय होतो दुष्परिणाम ?

— पोटात दुखणे , पोटात मळमळ होणे

–उलट्या होणे, जुलाबाच्या त्रास होणे

–तोंडात जळजळ होणं आणि घशाला खवखव होणे

–फळांवरील काही रसायनांमुळे हार्मोन्स वर परिणाम होतो.