सावधान ! आता PF अ‍ॅडव्हान्स काढून घ्याल तर 10 वर्षांनी ‘पस्तावाल’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन : सध्याच्या स्थितीला पीएफची रक्कम काढल्यास अ‍ॅडव्हान्समधून ही रक्कम मिळू शकणार आहे. परंतु, ही रक्कम परतफेड करण्याची आवश्यकता राहणार नाही.

1 . कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे लाखो खासगी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पगार कपातीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आर्थिक संकटाशी ल सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २.७ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती.

2 . या पॅकेजमुळे राष्ट्रीयीकृत बँकाकडून ईएमआय दिलासा, जन-धन सारख्या योजनांतून गरिबांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. त्याचसोबत नोकरदार वर्गाला दिलासा देताना नोकरीवरून कंपन्यांनी कमी करू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा आवाहन केले.

3 . तसेच नोरकदार वर्गाला आर्थिक संकटाशी दोन हात करण्यासाठी पीएफ काढण्याची परवानगी देण्यात आलीय. यामध्ये तीन पगार किंवा ७५ टक्के पीएफची रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ती काढता येईल. यासाठी पीएफकडून कोणताही कर किंवा परतफेडीची अट ठेवण्यात आली नाही.

4 . मात्र ही सुविधा जरी दिलासा देणारी असली तरी गरज असेल तेव्हाच तिचा वापर करावा. मागील १५ दिवसांत ईपीएफओने ३.३१ लाख लोकांचे क्लेम मंजूर करून ९४६.४९ कोटी रुपये देण्यात आले आहे. पण, काही जण पैसे काढायचे का नाही या विचारात आहेत.

5 . पीएफची रक्कम काढल्यास अ‍ॅडव्हान्समधून ही रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम परतफेड करण्याची गरज राहणार नाही.

6 . देशात आलेल्या कोरोना संसर्ग संकटामुळे ही रक्कम काढण्याची सूट देण्यात आली आहे. यामुळे या रकमेवरती कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. पाच वर्षांपेक्षा कमी नोकरीचा काळ असेल तर अशावेळी १० टक्के टीडीएस कापला जातो.

अ‍ॅडव्हान्स घ्यायचा की नाही?

7 . आता प्रश्न येतो, अ‍ॅडव्हान्स घ्यायचा का नाही? तुम्हाला जर खरोखरच पैशांची गरज असेल तर पीएफ खात्यामधून पैसे काढावेत. पण, हा शेवटचा पर्याय असावा. कारण असे केल्यास त्याचे मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल.

8 . दरम्यान, मंदी आणि महागाईच्या या काळात पीएफ वरती चांगले व्याज मिळत आहे. २०१९-२० या वर्षासाठी ८.५० टक्के व्याज देण्यात येतंय. अशावेळी जर तुम्ही तुमच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले तर भविष्यात तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते.

तोट्याचे गणित…

9 . सध्या जर तुम्ही ५० हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्स घेतला नाही तर १० वर्षांनी ती रक्कम १,१३,०४९ एवढी होणार आहे. तर सध्याच्या व्याजदराचा विचार करता २० वर्षांनंतर ही रक्कम २,५५,६०२ एवढी होणार आहे. तर ३० वर्षांनी ही रक्कम ५,७७,९१३ एवढी होईल. म्हणजेच तुम्ही जर आता पैसे काढले तर निवृत्ती दरम्यान तुम्हाला तब्बल ५,७७,९१३ रुपयांचा तोटा होणार आहे.

तर ईएमआय दिलासाही ठरणार हातबट्टयाचा…

10 . केंद्र सरकारने दिलेला ईएमआय दिलासा हातबट्टयाचा ठरणार आहे. कारण या दोन्ही सुविधा गरजवंतांसाठी असून त्याचा गैर फायदा घेणाऱ्याच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. यामुळे नोकरी गेली, मोठी पगार कपात झाली तरच या सुविधांचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे.