‘कोरोना’च्या काळात ‘अस्थमा’च्या रूग्णांनी ‘या’ 8 प्रकारे घ्यावी काळजी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हा व्हायरस त्या लोकांसाठी जास्त धोकादायक आहे, त्यांना अगोदरच मोठा आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना याकाळात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अस्थमाच्या रूग्णांना खोकला, शिंकणे, थंडी, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत जखडल्यासारखे वाटणे, श्वास घेताना घरघर आवाज येणे जोरात श्वास घेण्यात अडचण आदी समस्या असतात. अशा रूग्णांना कोरोना व्हायरस जीवघेणा ठरू शकतो.

अस्थमा एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये श्वसन नलिकेत सूज येते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. श्वासन नलिकेत अतिरिक्त म्यूकस तयार होतो. खोकला व इतर त्रास जाणवू लागतात. अशाकाळात या रूग्णांनी खास काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात अस्थमाच्या रूग्णांनी कशी काळजी घ्यावी.

अशी घ्या काळजी

1. अस्थमाच्या रूग्णांनी फिजिकल डिस्टन्सिंगची खास काळजी घ्यावी, जास्त लोकांच्या संपर्कात राहावे. जास्तीत जास्त वेळ मास्कचा वापर करावा.

2. या दरम्यान संतुलित आहार घ्यावा, पौष्टिक आहाराचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा. फळे, हिरव्या भाज्या सेवन कराव्यात.

3. अ‍ॅलर्जीचा धोका हवामान बदलताच वाढतो, यासाठी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

4. ज्यांना सर्दी-खोकला असेल, त्यांच्यापासून अस्थमाच्या रूग्णांनी दूर राहावे.

5. साफ-सफाईची विशेष काळजी घ्या. ज्या वस्तूंना तुम्ही सतत हाताळता त्यांच्याबाबत जास्त काळजी घ्या, त्या स्वच्छ ठेवा. उदाहणार्थ मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट व दरवाजांचे हँडल.

6. धुरामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, यासाठी काळजी घ्या.

7. तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा.

8. मेडिटेशनचा नियमित सराव करा. यामुळे मानसिक आणि शारीरीक दोन्ही पद्धतीने आरोग्यदायी राहू शकता.