सावधान ! ऑनलाइन व्यवहारासाठी Paytm वापरत असाल तर ‘ही’ काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईलमुळे सर्वांचे जीवन खूप सुखकर झाले आहे. सर्वांची कमी अगदी क्षणात होतात हा मोबाईलचा मोठा फायदा आहे मात्र कधी कधी याचे खूप मोठे तोटेही आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असतात त्याचा खूप फायदाही आपल्याला होतो मात्र त्याचा मोठा तोटाही होऊ शकतो. अशाच Paytm नामक अ‍ॅपने सर्व युझर्सला एक आवाहन केले आहे.

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची Paytm कडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. युजर्सकडून KYC भरताना सावध राहणे गरजेचे आहे असं Paytm ने सांगितले आहे. Paytm ने नोटिफिकेशन जारी करुन युजर्सला केवायसीसाठी एनीडेस्क अथवा क्विकसपोर्ट सारखे अ‍ॅप्स डाऊनलोड करु नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

काय म्हणलं आहे नेमकं नोटिफिकेशनमध्ये
एनीडेस्क अथवा क्विकस पॉर्टसारखे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्याने युजर्सच्या खात्यातील पैसे चोर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बँकांनीही ग्राहकांना अशाप्रकारे सूचना केल्या आहेत. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करुन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

अशा प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता देशातील काही इतर बँकांनी ग्राहकांना हे अ‍ॅप्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे.यावर्षीच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही लोकांना अशाप्रकारच्या अ‍ॅप्सपासून सावध राहा असं आवाहन केले आहे.

कशी होते नेमकी ग्राहकांची फसवणूक
अनोळखी नंबरवरून ग्राहकांना फोन केला जातो, आणि बँकेची माहिती मागितली जते चुकीची माहिती सांगाल तर ओंलीने बँकिंग बंद होईल अशी भीती दाखवली जाते आणि खऱ्या माहितीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो.

ग्राहकांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी ऐनी डेस्क अथवा टीमव्यूअर अ‍ॅप्ल डाऊनलोड करण्यास सांगितले जाते त्यानंतर स्क्रिन कॅप्चर सारख्या गोष्टीचा वापर करून तुम्ही मोबाईल स्क्रिन वरती जी माहिती टाकता ती रेकॉर्ड केली जाते आणि पैसे चोरीसाठी त्याचा वापर होतो. या संबंधीचे नोटिफिकेशन Paytm ने ग्राहकांना पाठवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –