सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी लागू केलेली असतानाही विनाकारण नागरिक बाहेर फिरत असून, वारंवार सांगूनही हे प्रमाण कमी होत नसल्याने आता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे शहरात विनाकारण फिरताना सापडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूचना देत याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर धक्कादायक म्हणजे, काही कोरोना बाधित देखील फिरताना दिसत आहेत.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी आहे. पण तरीही शहरात अनेकजण विनाकरण बाहेर फिरत असताना दिसून येत आहे. शहरातील रस्ते अन सिग्नल गर्दीने फुल नसले तरी ते वाहनांनी भरलेले दिसत आहेत. या कालावधीत अत्यावश्यक गोष्टींना परवानगी आहे. विकेंड लॉकडाऊन कडक निर्बन्ध आहेत. पण, गेल्या संचारबंदी असताना रस्त्यावर गर्दी आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेत यापुढे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वैध कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे सांगत आहोत. पण तरीही नागरीक व विशेष करून तरुण विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणूनच विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई व अन्य कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पोलिसांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले…

शहरात झपाट्याने कोरोना वाढत असताना आता त्याचा पोलिसांना देखील फटका बसत आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून, दररोज 12 ते 15 पोलिसाना कोरोनाची बाधा होत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व पोलिसांच्या (रॅपिड) चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दररोज क्षमतेनुसार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात काहीजण

बाधित असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांना कोरोना झाल्याचा आकडा वाढत आहे. त्यासोबतच शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या एसटी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि मार्केटयार्ड परिसरात पोलिस आयुक्तांनी सोमवारी स्वतः भेट देऊन पाहणी केली.