Helmets New Rule : केंद्र सरकारकडून हेल्मेटबाबतचे नवीन नियम लागू ! 5 लाखांचा दंड अन् 1 वर्षाची कैद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात हेल्मेट (Helmet) सक्ती करण्यात आल्याने अनेकजण दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरत आहेत. तर काही जण बेकायदेशीर (Illegal) आयएसआय (ISI) मार्क असलेल्या हेल्मटची (Helmet) विक्री करत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर आयएसआय मार्क हेल्मेटची विक्री करत असाल किंवा खरेदी करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई (Legal action) होऊ शकते. देशात कोरोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची असून 1 जून 2021 पासून यावर बंदी घातली आहे.

ISI मार्क हेल्मेट असणे बंधनकारक

तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि खेरदी केल्यानंतर परत तपासणी करणे आवश्यक आहे.

तुम्ही जे हेल्मेट खरेदी करत आहात, ते हेल्मेट सर्व ISI मानके पूर्ण करते का ? तसे प्रमाणपत्र (Certificate) आहे का ?

हे पाहणे आवश्यक आहे. याचच अर्थ 1 जून पासून सर्व दुचाकीस्वारांना ISI मार्क हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे.

तुम्ही खरेदी करत असलेले किंवा वापरत असलेले हेल्मेट BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफाइड (Certified) असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या नियम

रस्ते परिवहन (Road transport) आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 26 नोव्हेंबर 2020 मध्ये एक अधिसूचना (Notification) काढले होते. यामध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता आदेश, 2020 मध्ये ही हेल्मेट BIS प्रमाणित असायला पाहिजेत, असे नमूद केले होते. तसेच या हेल्मेटवर ISI मार्क असणे गरजेचे आहे.

अन्यथा 5 लाखांचा दंड, 1 वर्षाचा कारावास

रस्ते सुरक्षेच्या (Road safety) दृष्टीने आणि अपघात (Accident) कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

हा नियम न पाळणाऱ्यांना 5 लाखांचा दंड आणि 1 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे.

जो ISI सर्टिफाईड नसलेले हेल्मेट उत्पादन करेल किंवा त्याची विक्री करेल त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

हा दंड 5 लाखापर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर वाहतूक पोलीस (Traffic police) कारवाई करू शकतात.

यासाठी आधिपासूनच दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Also Read This : 

 

Ration Card | तुमच्याकडे रेशन कार्ड नाही? मग करा घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे