वर्क फ्रॉम होम करणार्‍यांनी व्हा सावध, अनेक गंभीर समस्यांचा आहे धोका

नवी दिल्ली : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सूरू झालेल्या लॉकडॉऊनपासून आता अनलॉकपर्यंत अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. परंतु, चुकीच्या पद्धतीने लॅपटॉपवर काम केल्याने तरूणांसह ज्येष्ठांनाही गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला आहे. सांधेदुखी होऊ लागली आहे. संपूर्ण वेळ कामातच जात असल्याने शारीरीक हालचाली कमी झाल्या आहेत. उठण्या-बसण्याची चुकीची पद्धत यामुळे विविध शारीरीक समस्या वाढत आहेत. या समस्या कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात.

महिलांमधील समस्या
वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये गुडघे आणि सांधेदुखीची समस्या सुरू होते, तर पुरूषांमध्ये ही समस्या जास्त वयात होते. सुमारे नव्वद टक्के महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असते, जे बोन मेटाबॉलिज्मला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते. चालताना याचा त्रास जास्त जाणवतो.

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
1 काही काळासाठी मेंदू स्तब्ध झाल्यासारखा वाटणे किंवा डोळ्यांसमोर अंधार पसरणे
2 पाठ, मान आणि शरीराच्या खालील भागात खुप वेदना
3 डोकं चक्कर करण्यासह अंग बंधीर होणे

यामुळे होते समस्या
जंक फूडचे सेवन आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळे गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. सुरूवातीला गुडघ्यात वेदना होतात. उठता-बसताना त्रास होतो, परंतु जेव्हा त्रास वाढतो तेव्हा चालणे-फिरणे अवघड होते. एकाच ठिकाणी बसून खूप वेळ काम करणे, कमी चालणे-फिरणे, लठ्ठपणा, उन्हाशी कमी संपर्क इत्यादीमुळे गुडघेदुखी होते.

हे उपाय करा
यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करा, सायकल चालवणे इत्यादी उपाय आहेत. व्यायाम केल्याने सांध्यातील मासपेशी मजबूत होतात आणि त्यांच्यात लवचिकता येते. सांध्याना योग्य सपोर्ट मिळतो. खाण्या-पिण्यावर सुद्धा नियंत्रण आवश्यक आहे.