सावधान ! जनतेला ‘सर्तक’ करण्यासाठी सोनाली नव्या भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत चाहत्यांनी मन जिंकली. सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अशातच आता सोनाली कुलकर्णी एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत सोनाली कुलकर्णी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. अशातच आता सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ५ एप्रिलपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सूत्रसंचालिका म्हणून चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. रात्री अकरा वाजता हा कार्यक्रम सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे.

आपल्या नव्या कार्यक्रमाबाबत बोलताना सोनालीनं सांगितलं की, “मी नुकतंच ‘क्राइम पेट्रोल’च्या टीमसोबत काम सुरु केलं. टीम खूप अप्रतिम आहे. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एका बॅटरीसारखा आहे. हा कार्यक्रम सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावं? याबद्दल जबाबदार असलं पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी कार्यक्रमातून करणार आहे.” सोनाली कुलकर्णी ‘क्राईम पेट्रोल सतर्क : जस्टिस रिलोडेड’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन करणार आहे.