जर NPR साठी दिली नाही माहिती तर होणार 1000 रूपये ‘दंड’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने माहिती दिली होती की, देशभर जनगणनेसोबत पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) देखील लागू केला जाईल. याबाबत गृह मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, जर एनपीआरसाठी कोणी माहिती देत नसेल किंवा चुकीची माहिती देत असेल तर अशा व्यक्तीला अधिकाराची एक हजारांपर्यंतचा दंड आकारू शकतात.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की नागरिकत्व नियमावलीचे नियम 17 नुसार चुकीची माहिती देण्यासाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच या नियम 2011 आणि 2015 मध्ये झालेल्या एनपीआर बाबत आकारला गेला नव्हता.

अरुंधति रॉयने केले होते वक्तव्य
डिसेंबरमध्ये सीएए,एनपीआर बाबत आंदोलन सुरु असताना अरुंधति रॉय यांनी लोकांना सांगितले होते की,ज्यावेळी अधिकारी माहिती घेण्यासाठी घरी येतील तेव्हा त्यांना चुकीची माहिती द्या. रॉय यांनी सांगितले होते की, ज्यावेळी अधिकारी घरी येऊन नावे विचारतील तेव्हा त्यांना रंगा-बिल्ला, कुंगफू-कट्टा अशी नावे सांगा.

एनपीआर अधिकाऱ्यांनी असेही म्हटले की,प्री – टेस्टमध्ये कोणीही त्यांचा आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्टचा इत्यादी माहिती देण्यास नकार दिला नाही. काही लोकांना फक्त पॅन क्रमांक देताना आक्षेप होता. या फॉर्मवरील पॅन क्रमांक देण्याचा पर्याय काढण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रिटेस्टसाठी 73 जिल्हे ठरवण्यात आले होते. यामध्ये 30 लाख लोकांचे सॅपल घेण्यात आले होते. एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, 80 % प्रकरणात लोकांनी स्वेच्छेने तपशील दिले, पण पॅनचा तपशील सांगायला संकोच केला, त्यानंतर आम्ही हा कॉलम एनपीआरमध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट केले आहे की आधार, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबरचा तपशील देणे बंधनकारक नाही.

गृहमंत्रालयाने अफवांचे केले खंडन
MHA च्या प्रवक्त्यांनी ट्विट केले की, एका बातमीत सांगितले गेले आहे की, तुमच्याकडे आधार, पासपोर्ट आहे ? कारण एनपीआरसाठी हे सर्व दाखवावे लागेल. तसेच मतदान ओळखपत्र आणि वाहन परवान्याची माहिती देणे देखील गरजेचे आहे. मात्र या गोष्टीचे खंडन करत अशा प्रकारे एनपीआर बाबत चुकीची माहिती आहे की ही कागदपत्रे एनपीआरसाठी द्यावी लागतील. अशा प्रकारची कोणतीच बातमी खरी नसल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे. एनपीआरची प्रक्रिया लोकसंख्या मोजणीच्या पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल पासून सुरु होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/