‘कोरोना’पासून बचावासाठी ‘या’ 5 पदार्थांचं सेवन नक्की करा

मुंबई , पोलिसनामा ऑनलाईन – सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. कोरोनामुळे अनेकजण भीतीच्या सावटा खाली जगत आहे. परंतु घाबरून न जाता योग्य खबरदारी जर घेतली तर नक्कीच कोरोनाला आपण चारहात लांब ठेऊ शकतो.

नेमकं कोणते पदार्थ खावे?
अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आले आहे कि, जीवनसत्वे कआणि ड या जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश जर आपण आपल्या आहारात केला तर कोरोनापासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो.

सी म्हणजेच क जीवनसत्वांमध्ये टोमॅटो ,फ्लावर ,ढोबळी,मेथी,यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकतो तसेच पेरू ,लिंबू ,मोसंबी ,संत्रे आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या क जीवनसत्व युक्त फळांचा आहारात समावेश करू शकतो त्याच प्रका

तसेच ड जीवनसत्व आरोग्याचा दृष्टीने खूप महत्वाचे आहे ड जीवनसत्व खाण्याचा पदार्थातून मिळतेच तसेच सकाळचा कोवळे उन्हं शरीरावर घेतल्याने ड जीवनसत्व शरीराला मिळते आता नेमके ड जीवनसत्व कोणकोणत्या पदार्थात असतें जाणून घेऊ मासे ताजे लोणी चीज मशरूम अंड्यातील पिवळाभाग सोयाबीन दूध कॉड लिव्हर ऑइल तसेच टोफू इत्यादी पदार्थां मधून ड जीवन सत्व शरीरास मिळते
वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, झिंक आणि ओमेगा-३ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आहार पोषक घटकांचा समावेश आरोग्यास उपयुक्त ठरू शकतो.

एकंदरीतच रोजचा आहारात क आणि ड जीवनसत्व युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास कोरोना संक्रमणापासून आपण स्वतःला वाचवू शकतो