‘बीच बेबी’ मौनी रॉयनं शेअर केला पिवळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो, लावली पाण्यात ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉय सध्या थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. शनिवारी 28 सप्टेंबर रोजी ती 34 वर्षांची झाली. सध्या थायलंडमध्ये ती बर्थडे व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. बर्थडे व्हॅकेशनचे फोटो मौनी सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिचे पिंक कलरच्या बिकीनीमधील काही फोटो व्हायरल झाले होते. तिने सोशलचं वातावरण चांगलंच तापवलं होतं. वातावरण शांत होत नाही तेच पु्न्हा तिने पिवळ्या रंगाच्या बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी कमालीची सुंदर दिसत आहे. पाण्यात उभी राहून मौनी पोज देत आहे. नेहमीप्रमाणे घायाळ करणारे एक्सप्रेशन मौनीच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. मौनी खूपच बोल्ड आणि तितकीच फॅशनेबल दिसत आहे. मौनीने पिवळ्या रंगाच्या बिकीनीवर ट्रांसपरंट जाळीदार स्लीव्हलेस कोटसारखा ड्रेस घातला आहे.

पिवळ्या बिकीनीतील मौनीचा आणखी एक फोटो आहे ज्यात मौनी एका हॉटेलमध्ये बसलेली दिसत आहे. तिच्या टेबलावर नारळपाणीही दिसत आहे. या फोटोतील मौनीचे एक्सप्रेशन आणि खास अदा पाहण्यासारखी आहे. मौनी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असते. ती तासन् तास जीममध्ये घालवत असते.

https://www.instagram.com/p/B3G9MljBlpW/

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मौनी लवकरच मेड इन चायना या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात ती राजकुमार राव सोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत रोमियो अकबर वॉल्टर या सिनेमातही दिसणार आहे. याशिवाय अयान मखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमातही ती झळकणार आहे.

Visit : Policenama.com