Beans benefits | ‘सुडौल’ कंबर हवी असेल तर ‘बीन्स’चं सेवन करा, प्रोटीन सुद्धा मिळतील भरपूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Beans benefits | राजमा, छोले, चवळी आणि हिरव्या शेंगा हे सर्व बीन्सच्या श्रेणीत येतात. छोले-चावल किंवा राजमा-चावलचे नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यातील न्यूट्रिशन्स शरीरासाठी खुप लाभदायक आहेत. हिरव्या शेंगा आजारांना दूर ठेवतात, सोबतच शरीराला आतून ताकद देतात. बीन्स खाल्ल्याने (Beans benefits) शरीराला कोणते फायदे होतात जाणून घेवूयात…

भरपूर फायबर-
बीन्स फायबरचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि पचनाच्या समस्या दूर होतात. एक कप सफेद राजमामध्ये 19 ग्रॅम फायबर आढळते.

भरपूर प्रोटीन –
बीन्समध्ये लो-फॅट, लो-कॅलरी प्रोटीनसह फायबर आणि कार्ब्स भरपूर असते. एक कपमध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतात. यासाठी राजमा आणि शेंगा खा.

वजन कंट्रोल करते –
बीन्स वजन नियंत्रणात ठेवते. जे लोक नियमित बिन्स खातात त्यांची कंबर सुडौल असते. यामुळे लोअर बॉडी फॅट कमी होते.

हृदयासाठी चांगले –
जे लोक नियमित प्रकारे बीन्स खातात ते हृदयाच्या आजारापासून दूर राहतात. हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. यासाठी बीन्स, बीट आणि हिरव्या भाज्या खा.

डायबिटीज नियंत्रित करते –
बीन्स खाल्ल्याने डायबिटीजसह हाय ब्लड शुगर कमी होते. ताजे ग्रीन बीन्स उकडून ऑलिव्ह ऑईल आणि मीठ टाकून खाऊ शकता.

आयर्नची कमतरता पूर्ण करते –
ब्लड आणि हार्मोन्ससाठी आयर्न आवश्यक आहे. आयर्न सर्व अवयवांपर्यंत ऑक्सीजन पोहचवते. एक कप सोयाबीन शेंगामध्ये जवळपास 9 मिलीग्रॅम आयर्न असते.

 

मॅग्नेशियम भरपूर –

मॅग्नेशियम शरीरात प्रोटीन आणि हाडे मजबूत करते. ब्लड शुगर स्थिर ठेवते. एक कप काळ्या राजमामध्ये 120 मिलीग्रॅम मॅग्नेशियम असते.

झिंकची कमतरता होते पूर्ण –
किटाणूंशी लढण्यासाठी शरीराला झिंकची आवश्यकता असते. हे जखम भरण्यास मदत करते. झिंक मुलांमध्ये चव आणि वास ओळखण्याची क्षमता वाढवते. एक कप छोलेमध्ये 2.4 मिलीग्राम झिंग आढळते.

बीन्स खाल्ल्याने पोटात गॅस होतो का –
आहारात खुप बीन्स खाल्लयाने पोटात गॅस होऊ लागतो. यामुळे अनेक लोक राजमा, छोले खाणे टाळतात. बीन्समुळे पोटात तयार होणारा गॅस नुकसानकारक नसतो. परंतु थोडा त्रास होऊ शकतो. आहारात थोड्या-थोड्या बिन्सचा समावेश करा. यामुळे शरीराला सवय होईल. बीन्समुळे गॅस होत असेल तर भरपूर पाणी प्या. आराम मिळेल.

Web Title :- beans benefits in marathi protein source diabetes control

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘पतंजली’च्या नावावर सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा

International Call Fraud | ALERT ! ‘नो नंबर’ म्हणजे संकट, चुकूनही ‘रिसीव्ह’ करू नका असा कॉल, होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Modi Government | मोदी सरकारने लाँच केले ‘पीएम दक्ष पोर्टल’ ! रोजगाराला चालना देण्यासाठी दिले जाईल ‘कौशल्य’ प्रशिक्षण, जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ