अभिनेत्री राखी सावंतने ‘त्याच्या’शी गुपचूप केलं ‘लग्न’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप मुंबईत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे. एका वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. ज्यात म्हटले आहे की, राखी सावंतने एनआरआय मुलासोबत गुपचूप लग्न केलं आहे. यात असेही म्हटले आहे की, तिने जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये लग्न केलं आहे. २८ जुलै रोजी राखी विवाहबंधनात अडकली.

या वेबसाईटने असे म्हटले होते की, हे लग्न गोपनीय पद्धतीने पार पडले आहे. फक्त घरातेलच या लग्नाला उपस्थित होते. ४ ते ५ लोकच या लग्नाला आले होते. ही गोष्ट लपून रहावी म्हणून हॉलमध्ये लग्न न करता त्यांनी एका रुममध्ये लग्न केलं.

जेव्हा राखी सावंतला याबाबत विचारण्यात आले तेव्हा एका वृत्तपत्राशी बोलताना तिने हे वृत्त फेटाळले. राखीने सांगितले की, ती अविवाहित आहे. शिवाय काही OTT प्लॅटफॉर्मसाठी तिने ब्राईडल लुकमध्ये शुट केल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “काय माहीत का लोक मला सुखाने जगू देत नाहीत.”

राखी म्हणाली की, “मी अविवाहित आहे. काल जे डब्ल्यू मॅरियटमध्ये माझं कॅटलॉग शुट होतं. एखाद्या अभिनेत्रीने मेहंदी लावली की, लग्न झालं. रिंग घातली की, लग्न झालं. हॉस्पिटलमधून बाहेर आली तर अबॉर्शन केलं. दोन चार लोकांसोबत फिरली की सिक्रेटली लग्न केलं. हे सगळं काय आहे. एका अ‍ॅक्ट्रेसने जगायला नको का? सिंदूर लावला की लग्न झालं. आम्ही सीरीयलही करू शकतो ना. आम्ही शुटींगही करू शकतो ना.”

राखी सावंत स्पेशल नंबर करण्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तिने अनेक सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केले आहे. याआधी तिचे दीपक कलालसोबत काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. यामध्ये दोघे लग्न करण्याबाबत बोलत होते.

आरोग्यविषयक वृत्त –