Beard Hair Care Tips | तुमच्या दाढीचे सुद्धा केस गळतात का? या 5 सोप्या पद्धतीने थांबवा ‘बियर्ड हेयर फॉल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Beard Hair Care Tips | केस गळण्याची समस्या पुरुषांसोबतच महिलांमध्येही आढळते, परंतु केस गळण्याव्यतिरिक्त अनेक वेळा पुरुषांच्या दाढीचे केसही गळू लागतात. अशावेळी दाढीचे केस गळण्याचे थांबवणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक काम होते. तुमची इच्छा असल्यास, काही सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही दाढीचे केस गळणे थांबवू शकता. दाढीचे केस गळण्याची कारणे आणि ते थांबवण्याचे उपाय जाणून घेऊया. (Beard Hair Care Tips)

 

दाढीचे केस गळण्याची कारणे :

1. अनुवांशिक
2. बुरशीजन्य संसर्ग
3. टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता
4. केमोथेरपी
5. ऑटोइम्यून रोग
6. प्रोटीन आणि झिंकची कमतरता
7. स्वच्छता, देखभालीचा अभाव

 

दाढीची केस गळती थांबवण्यासाठी करा हे उपाय

1. व्हिटामिन्स आणि मिनरल्सचे सेवन करा :
काही वेळा शरीरातील व्हिटामिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळेही दाढीचे केस गळतात. अशावेळी डाळी, अंडी आणि हिरव्या भाज्या यांसारखी व्हिटामिन्स आणि मिनरल्सनी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करून तुम्ही दाढीचे केस गळण्याची समस्या मुळापासून दूर करू शकता. (Beard Hair Care Tips)

 

2. आवळा सेवन करा (Amla) :
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. अशावेळी तुम्ही आवळा देखील आहारात समाविष्ट करू शकता. रोज आवळ्याचे सेवन केल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतातच पण केसांमध्ये चमकही येऊ लागते.

3. दाढीचा मसाज (Beard Massage) : 
दाढीचे केस गळणे थांबवण्यासाठी आणि दाढीचे केस मुळापासून मजबूत करण्यासाठी तुम्ही मसाज करून पाहू शकता. यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून दाढीला लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.

 

4. मोहरीचे तेल वापरा (Mustard oil) :
दाढीचे केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही दाढीला मोहरीच्या तेलाने मसाज देखील करू शकता. यासाठी दाढीला मोहरीचे तेल लावा. नंतर हलक्या हातांनी दाढीला थोडा वेळ मसाज करा.

 

5. ड्रायफ्रूटचे सेवन करा (Dry Fruit) :
पोषकतत्वांनी युक्त असलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या दाढीचे केस गळणे थांबते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Beard Hair Care Tips | beard hair fall cause and solution at home

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tender Coconut Cream | नारळपाणी प्यायल्यानंतर फेकू नका त्याची मलई, 5 फायदे जाणून घेतल्यास असे कधीही करणार नाही

 

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी रामबाण आहे ‘हे’ 5 आयुर्वेदिक फूड्स, कंट्रोल राहील शुगर लेव्हल

 

Natural Ways to Reduce Headache | पेनकिलर्स घेण्यापेक्षा ‘या’ 7 घरगुती पद्धतीने बरी करा डोकेदुखी, झोप सुद्धा लागेल शांत