‘क्लीन शेव’ की ‘बियर्ड’ मॅन ? कोणावर मुली जास्त फिदा ? जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीपासून तर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी सध्या बियर्ड ठेवताना दिसत आहेत. सध्या बियर्ड फॅशनच्या या जमान्यात पुरुषांसाठी खुशखबरी आहे. एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे की, बियर्ड ठेवणाऱ्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.

संशोधकांचं म्हणणं आहे की, दाढी ठेवणारे पुरुष शारीरिक आणि सामाजिक पातळीवर जास्त प्रभावी वाटतात. कदाचित हेच कारण आहे की महिला त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. असं असलं तरी काहींनी दाढी न आवडण्याचं कारणही दिलं आहे. काही महिलांनी सांगितलं की, केसांमध्ये बॅक्टेरिया, उवांच्या भीतीने त्यांना दाढी असणारे पुरुष आवडत नाहीत. 1000 महिलांवर याबाबत सर्व्हे करण्यात आला. पार्टनरच्या बियर्ड लुकबद्दल त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलँडच्या संशोधकांनी या शोधात 18 ते 70 वर्षांच्या एकूण 919 महिलांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर त्यांना वेगवेगळ्या पुरुषांचे 30 फोटो दाखवण्यात आले.

या फोटोंमध्ये बियर्ड आणि क्लील शेव असणाऱ्यांचे फोटो होते. काहींचे चेहरे सॉफ्ट दाखवण्याचाही प्रयत्न केला तर काहींचा जरासा मर्दाना दाखवला गेला. चेहरा, जबडा भुवया यासाठी त्यात काही बदल केला गेला. ज्या महिला यात सहभागी झाल्या होत्या त्यांना हे फोटो पाहून आकर्षक असण्यासोबतच लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म रिलेशनसाठी शून्य ते 100 अशी रेटींग द्यायची होती.

या शोधातून समोर आलं की, महिलांनी बियर्ड ठेवणाऱ्या पुरुषांना जास्त रेटींग दिलं. मर्दान चेहरा असणाऱ्या बियर्ड वाल्या पुरुषांच्या फोटोला सर्वात जास्त पसंत केलं गेलं. प्रमुख संशोधक टेसा क्लार्कसन यांनी यामागील कारण सांगितलं आहे.

टेसा क्लार्कसन यांनी सांगितलं की, “मर्दाना चेहरे शारीरिकरित्या मजबूत आणि सामाजिकरित्या प्रभावशाली वाटतात. रुंद जबडा चेहऱ्यावरील कमी आकर्षक भागांना लपवतो. परंतु ज्या महिलांना स्वच्छतेची किंवा बॅक्टेरियाची भीती असते त्यांना मात्र बियर्ड ठेवणारे पुरुष आवडत नाहीत.” असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/