हद्दीत सुरु होता दारूचा अवैध कारखाना, बीट जमादार निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडपासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या पारगाव शिरस येथे सुरु असलेल्या अवैध दारू कारखान्यावर पोलीस अधिक्षकांनी छापा मारला. त्यानंतर याप्रकऱणी बीड ग्रामीण मधील पारगाव शिरस यथील बीट जमादाराला निलंबित करण्यात आले आहे.

भारत जायभाय असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील पारगाव शिरस येथे अवैधपणे विदेशी दारू तयार करण्यात येत होती. यापरिसरात यापुर्वी अनेकदा धाडी टाकण्यात आल्या. परंतु दोन दिवसांपुर्वीच पोलीस अधिक्षकांनी या कारखान्यावर धाड टाकून हा प्रकार पुन्हा उजेडात आणला. या धाडीनंतर बीड पोलीस अधिक्षकांनी बीड ग्रामीणचे कर्मचारी भारत जायभाय यांना निलंबित केले आहे.