दारूच्या नशेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण बीट मार्शलने वाचविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – “मी घरात लटकून घेतो आहे, तू घरी येई पर्यंत माझे मढे तुला मिळेल” असं पर्वती दर्शन येथील चाळीत राहणाऱ्या तरुणानं आपल्या पत्नीला फोन करून सांगितले. त्यानंतर तिने थेट याची माहिती पोलिसांना दिली. आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यातील २ बीट मार्शलने तातडीने धाव घेऊन घरात लटकलेल्या तरुणाला त्यांनी सोडवून रुग्णालयात दाखल केले आणि त्याचे प्राण वाचले.

पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार,अनिल लांडे अशी तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या दोन पोलीस कॉन्सटेबलची नावे आहेत. त्यांनी निलेश सुरेश साळवे (वय ३७) या तरुणाचे प्राण वाचविले. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

१४ मे २०१९ रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार, अनिल लांडे हे पर्वती दर्शन भागात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिट मार्शल ड्युटी करत होते. त्या वेळी त्यांना पोलीस कंट्रोल रूम कडून एक मेसेज मिळाला की, पर्वती दर्शन चाळ नंबर ५१ मध्ये एक गळफास लावून घेत आहे.

हे स्थानिक नागरिकांनी कळविले आहे. आपण ताततडीने तेथे जाऊन त्याला वाचवा. ही माहिती मिळताच दोघेही दिलेल्या पत्त्यावर गेले आणि त्यांनी पाहिले. तेव्हा एका घराचा लोखंडी दरवाजा आतून बंद केलेला होता. त्या घराच्या खिडकीतून पाहिले तेव्हा एक युवकाने घराच्या छताला लाल ओढणीने स्वतःला लटकवून घेतले होते.

त्याचे पाय हालताना दिसत होते. त्याला वाचविण्यासाठी विष्णू सुतार, अनिल लांडे या पोलिसांनी लोखंडी दरवाजा तोडला. व त्याला उचलून बाहेर आणले. तो बेशुद्ध असल्याने त्याला सर्वात प्रथम रिक्षातून हरजिवन हॉस्पिटल व त्या नंतर पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.

त्याची पत्नी रोजमेरी निलेश साळवे (रा. चाळ नंबर ५१/१ पर्वती दर्शन,पुणे) या म्हणाल्या, त्यांचे पती निलेश सुरेश साळवे हे अति दारूच्या नशेत घरात असताना मानसिक संतुलन ढळले की,त्यांच्या मनात असे स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार येत असल्याने ते खरच काही विपरीत करून घेतील ह्या चिंते मधून त्यांनी सर्वात प्रथम पोलिस नियंत्रण कक्ष येथे मदतीसाठी ही माहिती कळवली.एक युवक आत्महत्या करतो आहे.

त्याचा जीव वाचवला पाहिजे ह्या भावनेतून दत्तवाडी पोलीस स्टेशन चे बिट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार,अनिल लांडे,यांनी अत्यंत जलद गतीने हालचाली करून पोलीस नियंत्रण कक्ष येथून त्या युवकांचा दिलेला पत्ता शोधून काढून सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण,पोलीस हवालदार अशोक हिरवाळे, नितीन केरीपाळे यांच्या मदतीने काही वेळात सर्व आवश्यक कार्यवाही करून निलेश सुरेश साळवे याचा जीव वाचविला.