टेरर फंडिंग ! अचानकपणे ‘लखपती’ झालेले ‘श्रीमंत’ पोलिसांच्या ‘रडार’वर, IB च्या मदतीनं होणार तपास

बरेली : वृत्तसंस्था – टेरर फंडिंग आणि हवाला नेटवर्कच्या माध्यमातून पोलिस आता अचानक श्रीमंत झालेल्या लोकांवर लक्ष ठेवणार आहेत. बरेली व बदायून या गावात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर एडीजीने संपूर्ण झोनमधील अधिकाऱ्यांना गुप्तचरांच्या मदतीने हे अभियान चालवण्याचे निर्देश दिले आहेत. अचानक आलेल्या श्रीमंतांचा तपशील गोळा करून अधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी तैनात असलेल्या शिपायांना देण्यात आली आहे.

एडीजीचे अविनाश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस टेरर फंडिंग आणि हवालासंदर्भात चौकशी करत आहे. पोलिसही बेकायदेशीर आणि देशद्रोही कार्यकर्त्यांविरूद्ध मोहीम राबवतील. तैनात असलेल्या शिपायांना अचानक लोक श्रीमंत होत असल्याचे समजेल आणि मग त्यांच्या कमाईची पडताळणी होईल. तैनात असलेल्या शिपाई पोलिस स्टेशन प्रभारींकडे आपला अहवाल सादर करतील, त्यानंतर काही गडबड आढळल्यास संयुक्त पथकासह कारवाई केली जाईल. जुन्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या नोंदी गोळा करून त्यांची अलीकडील स्थिती जाणून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Visit : Policenama.com