PMPML बस कंडक्टरला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीला रस्ता न दिल्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल कंडक्टरला दोघांनी मारहाण केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर शिंदे (वय २९, रा. कोथरुड) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पीएमपीएमएल बस कंडक्टर असून रविणारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एनडीएक महानगरपालिका मार्गावरील प्रवाशी घेउन बसमधून उत्तमनगर परिसरातून चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी जोरजोरात हॉर्न वाजवित पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला.

त्यावेळी ज्ञानेश्वर यांनी दुचाकीस्वाराला रस्ता अरुंद असल्यामुळे थांबण्यासाठी हात केला. त्याचा राग आल्याने एकाने ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत डेरे अधिक तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like