लॉस एंजिलिसच्या भूकंपामुळे टीना मुनीम आणि अनिल अंबानी झाले एकमेकांचे

पोलीसनामा ऑनलाइन – काही वर्षांपूर्वी अनिल अंबानी यांनी एका विवाह समारंभात टीना मुनीम यांना पाहिलं होत. पण टीना यांना चित्रपटसृष्टीत करियर करायचे होते. त्यामुळे त्यांच्या नात्याला घरातुनच विरोध होणार याची अनिल यांना कल्पना होती. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर टीना मुनिम या संजय दत्तसोबत नात्यात होत्या. दरम्यान, अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये प्रचंड मोठा भुकंप झाला होता. त्यावेळी टीना तिथेच होत्या.

ही गोष्ट ज्यावेळी अनिल यांना समजली त्यावेळी त्यांना टीना यांची काळजी लागली. त्यावेळी अनिल यांच्याकडे त्यांचा नंबरही नव्हता. त्यांनी टीना यांचा नंबर शोधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर दोघांचेही नियमित संभाषण सुरू झाले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला अनिल यांच्या घरातून त्या दोघांच्या नात्याला विरोध होता. पण कालांतराने तो निवळला. अनिल अंबानी आणि टीना मुनिम यांचे १९९१ मध्ये धुमधडाक्यात लग्न झालं. अमेरिकेतील भुकंपामुळे अनिल आणि टीना कायम एकमेकांचे झाले.