home page top 1

#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

पोलिसनामा ऑनलाइन टीम : दिवेसंदिवस वाढणारा कामाचा व्याप आणि घरगुती अडचणी यामुळे कोणत्याही व्यक्तीला मानसिक ताण येणे स्वाभाविक आहे.साधारणपणे अशा वेळी आत्मविश्वास खचण्याची अधिक शक्यता असते. आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच सौंदर्य वाढविण्यासाठी आणि सौंदर्य टिकविण्यासाठी नटराजन आसन हा रामबाण उपाय आहे.नटराजन आसन नियमीत केल्याने शरीर ताजेतवाने होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. हे आसन भगवान शिव शंकराचे प्रमुख आसन असल्याने या आसनाला नटराजन आसन किंवा नटराजासन म्हणतात.

कसे कराल हे आसन :

नटराजन आसन करण्यासाठी दोन्ही पाय जुळवून उभे राहा. यानंतर डाव्या पायावर भार देऊन तोल सावरत उजवा पाय सावकाश मागच्या दिशेने वर उचला. आता उजवा हात मागे नेऊन उजवा पाय पकडा. सामान्य श्वास उच्छ्वास चालू राहू द्या. काही काळ या स्थितीत स्थिर राहा. नंतर दुसर-या पायावर हेच आसन करा.

नटराजन आसनाचे फायदे :

हे आसन नियमित केल्याने हातापायाच्या स्रायूंचा विकास होतो. स्रायू सुदृढ होतात. शरीरावर नियंत्रण येते. मनाची एकाग्रता तसेच निर्णयक्षमताही वाढते. यामुळे आत्मीक शांती मिळते. जवानी टिकून राहते. या आसनाच्या नियमीत सरावाने म्हातारण आणि आजारपण दूर राहते. यामुळे तुमच्या सौंदर्यात वाढ होऊन
ते टिकून राहते.

आरोग्यविषयक वृत्त

#YogaDay2019 : ज्ञानमुद्रेद्वारे जागृत करा; तुमच्या ‘सुप्त शक्ती’

#YogaDay2019 : निरोगी व आकर्षक चेहऱ्यासाठी सर्वोत्तम मार्ग ‘फेस योगा’

#YogaDay2019 : अपचनाचा त्रास आहे? वज्रासन केल्यास मिळेल आराम

#YogaDay2019 : योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा

सिने जगत

अभिनेत्री कतरिना कैफला व्हायचंय ‘भाईजान’ सारखं ‘चुलबुल पांडे’

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

Loading...
You might also like