‘नियोजित’ वरानं ‘लठ्ठ’ असल्यानं सोडून दिलं, मुलीनं स्वतः एवढं बदललं अन् घेतला ‘बदला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन वर्षापूर्वी लठ्ठपणामुळे जेन एटकिन नावाच्या युवतीचे लग्न मोडले होते. ‘तू खूप जंक फूड खातेस, ज्यामुळे तू खूप लठ्ठ झाली आहे. असे म्हणत तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्न मोडले होते. मात्र, त्यांनतर तिने असे काही करून दाखवले, ज्यामुळे सगळेच चकित झाले.

ब्रेकअपनंतर जेन एटकिन यांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम झाला. तिला कुठेतरी निराश वाटू लागलं. दुसरीकडे, तिने स्वत: ला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे तिचे आयुष्यच बदलले नाही तर, तिला लठ्ठ म्हणवणार्‍या तिच्या पूर्वीच्या त्या मित्रालाही चांगलाच धडा मिळाला. बर्‍याच लोकांनी तिचे नाव ‘अल्टिमेट रीव्हेंज’ ठेवले आहे. कारण, जेनने स्वतःला कठोर परिश्रमानंतर फिट केले. इतकेच नाही तर तिने ब्युटी स्पर्धेमध्ये देखील भाग घेतला. ज्यानंतर तिने ‘मिस ग्रेट ब्रिटन’चा ‘किताब आपल्या नाव केला.

मंगेतर ने मोटी कहकर छोड़ा, लड़की ने खुद को बदलकर ऐसे लिया बदला

एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणारी 26 वर्षीय जेन उल्सबी येथील रहिवासी आहे. तिने हेल्दी डाएट सोबत फिटनेसचीही पूर्ण काळजी घेतली आणि दोन वर्षांत स्वत: ला पुर्नतऱ्हेने फिट केले. तिने सर्वात आधी (Miss Scunthorpe )चा ‘किताब आपल्या नाव केला. यानंतर, 2018 मध्ये मिस इंग्लंड स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली. 2018 च्या मिस इंग्लंड स्पर्धेत नशीब फारसा साथ देऊ शकले नाही. त्यांनतर तिने थोडा ब्रेक घेतला पण त्यानंतर 75 व्या मिस ग्रेट ब्रिटन स्पर्धेत पुन्हा सहभाग घेतला आणि तो ‘किताब आपल्या नावावर केला.

You might also like