भिवंडी : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सपासप 10 वेळा वार, नंतर चिरला गळा

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन –   भिवंडी शहरात एका 38 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं सपासप वार करून निर्घृपणपणे खून करण्यात आला आहे. ही महिला तीनबत्ती परिरातील होती. शनिवारी सकाळी ही घटना घडली. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं ?

समोर आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी उर्फ पूजा भुरला (30) असं खुन झालेल्या मृत महिलेचं नाव आहे. ही महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. शनिवारी सकाळी ती घरात एकटीच होती. यावेळी अज्ञात मारेकऱ्यानं या महिलेच्या घरात घुसून तिची धारदार शस्त्रानं तिच्यावर 9-10 वार केले आणि तिचा गळा चिरून तिचा खून केला.

अशी समोर आली घटना

सदर मृत महिलेचा मुलगा रात्रपाळीचं काम करतो. काम उरकल्यानंतर जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा हा भयानक प्रकार समोर आला. जेव्हा तो घरी आला तेव्हा दार लॉक होतं. जेव्हा तो दार उघडून आता आला तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात त्याच्या आईचा मृतदेह दिसला. हे पाहून त्याला जोरदार धक्का बसला.

या घनटेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबचं पथक घटना दाखल झालं आणि पंचनामा करण्यात आला. अद्याप तरी याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस सध्या याचा तपास करत आहेत.

ओळखीच्याच व्यक्तीनं काढला काटा ?

या महिलेचा खून हा ओळखीच्या व्यक्तीकडून करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. याशिवाय घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला होता आणि नंतर खून झाला आहे.