डार्क अंडरआर्म्सच्या समस्येला करा ‘बाय-बाय’, जाणून घ्या ‘हे’ 3 उपाय

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – मुलीं आपल्या हातांसोबत आपल्या अंडरआर्म्सची देखील काळजी घेत असतात. पण काहीवेळा चुकीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तेथील त्वचा काळी पडते. त्यामुळे मुलींनी हात वर करण्यासही लाज वाटते. अशावेळी तुम्ही काही उपाय करुन या समस्येपासून सुटू शकता. त्यामुळे आठवड्यातून एकदा अंडरआर्म्सवर कडुलिंबाची पेस्ट लावा. ही पेस्ट लावल्यामुळे काळेपणा दुर होईल. कडूलिंब हे एक चांगले अ‍ॅन्टीबॅक्टेरिअल आहे. यामुळे अंडरआर्म मध्ये घाम येत नाही आणि दुर्गंधीचा त्रास देखील संपतो.

कोरफड वापरा
कोरफडचा वापर सामान्यत: जास्त केला जातो. कोरफडचा गर अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणा दूर होतो.

नारळ तेलाने त्वचा चमकते
नारळ तेल हा आणखी एक पर्याय आहे जो आपल्याला गडद अंडरआर्म्सच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. त्यात व्हिटॅमिन ई असते जे त्वचेचा टोन लाइट करतो.

बटाटा रस मदत करेल
बटाट्यात अत्यल्प प्रमाणात अ‍ॅसिड असते, ज्यामुळे अंडरआर्मवर लावल्याने कोणतेही इन्फेक्शन होत नाही. बटाट्यांना नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील म्हणतात. त्याचा दररोज वापर गडद अंडरआर्म्सची समस्या दूर करतो.

लिंबूचा वापर देखील फायदेशीर
लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. यामुळे गडद अंडरआर्म्सच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो. हे कोणतेही नैसर्गिक क्लीन्झर नाही परंतु त्यातील अ‍ॅसिडमुळे त्वचा लाइट होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, लिंबामुळे त्वचा कोरडी होते, त्यामुळे त्वचेला मॉइश्चराइझ ठेवणे महत्वाचे आहे.