Celebrity Hair Care : वयाच्या 51व्या वर्षी देखील काळे आणि चमकदार आहेत भाग्यश्रीचे केस, सांगितलं रहस्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री 51 वर्षांची आहे, पण तिला पाहून तुम्ही चकित व्हाल. कारण तिने आपली त्वचा आणि केस खूप चांगले राखले आहेत. भाग्यश्री तिच्या फिटनेस आणि स्किन केअर रूटीनशी संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. जे तिचे चाहते पाहतात आणि त्यांना ते खूपच आवडतात.
भाग्यश्रीने केसांची निगा राखण्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मेथीचे केस पॅक लावताना दिसली आहे. तर आपल्याला असे वाटत असेल की बॉलिवूड स्टार केवळ महागडे शैम्पू आणि कंडिशनर वापरतात, पण तसं नसतं. चला जाणून घेऊया भाग्यश्रीचे हे हेअर पॅक कसे बनवायचे आणि ते लावण्याचे फायदे …
मेथी आणि कोकोन हेअर पॅक कसा बनवायचा
साहित्य
1 कप मेथी दाणे
1 कप नारळाचे दूध
कृती : 
– रात्री मेथी पाण्यात भिजवा.
– सकाळी मेथी आणि खोबऱ्याचे दुध एकत्र करून पेस्ट बनवा.
– आपण आपल्या केसांच्या लांबीनुसार सामग्री वाढवू किंवा कमी करू शकता.
– केसांना सुमारे 40 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर सौम्य शैम्पूने धुवा. कंडिशनरची आवश्यकता नाही.
नारळाच्या दुधातील लॉरिक ऍसिड केसांचे मुळं मजबूत करते आणि केस गळण्यास प्रतिबंध घालते. आपले केस केराटीनचे बनलेले आहेत, जे एक प्रकारचे प्रोटीन आहे. नारळाच्या दुधात उच्च प्रथिने असतात जे संभाव्यतः आपले केस मजबूत ठेवू शकतात. हे लक्षात ठेवा की बाजारातून आणलेले नारळ दूध शुद्ध नाही, म्हणून जास्तीत जास्त फायद्यासाठी शुद्ध नारळाचे आपल्या केसांवर वापरा.
नारळाचे दूध बनवण्यासाठी, 1 संपूर्ण नारळ आणि 2 कप कोमट पाणी घ्या. नारळाचा पांढरा भाग काढून टाका. नंतर ते बारीक करून मिक्सरमध्ये गरम पाण्याने बारीक करून घ्या. हे मिश्रण कपड्यात चाळून घ्या. आपले नारळ दुध तयार असेल.
केसांसाठी मेथीचे फायदे
मेथीमध्ये निकोटीनिक ऍसिड भरपूर असते जे केस गळती रोखण्यास मदत करते. हे एका क्षणात आपल्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करू शकते. मेथीचे दाणे विविध पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात. हे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतात. रोज मुठभर भिजलेली मेथी दाणे खाल्ल्यास अकाली केस पांढरे होत नाहीत.
जाता जाता भाग्यश्रीनेही एक चांगली गोष्ट शेअर केली आणि चांगले खाल्ले तरच केस आरोग्यदायी आणि चमकदार होतील. याशिवाय, आपल्या केस आणि त्वचेमध्ये चमक कायम राहण्यासाठी व्हिटॅमिन-ए, बायोटिन आणि ओमेगा -3 घेणे देखील खूप महत्वाचे आहे.