तुमच्या केसांना मजबुत ठेवायचं तर मग ‘या’ 5 गोष्टी आवश्य स्वयंपाक घरात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केस सुंदर आणि मजबूत असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र धूळ, माती, प्रदूषण अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळू लागतात. मात्र आपण आपल्या रोजच्या स्वयंपाक घरातील पुढील पाच गोष्टी वापरल्या तर मजबूत केस बनवू शकता.

Image result for मेथीचे दाणे

मेथीचे दाणे
रात्री झोपण्यापूर्वी मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठून हे दाणे चांगले कुटून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा आणि चाळीस मिनिटांपर्यंत ही पेस्ट केसांवर लावा आणि नंतर धुवून टाका. महिनाभर याचे पालन केल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल. यामुळे केवळ केस गळणेच थांबत नाही तर अनेक फायदे देखील होतात.

Image result for आवळा

आवळ्याचा करू शकता वापर
आवळ्यामधे मोठ्या प्रमाणावर विटामिन सी असते आणि आवळा केसाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतो. एक चमचा आवळा घेऊन त्यामध्ये लिंबू टाका आणि हे मिश्रण केसांना लावून झोपी जा आणि सकाळी उठल्यावर थुवून टाका. यामुळे केस खूप मजबूत होतात.

Image result for कांद्याचा रस

कांद्याचा रस
कांद्याचा रस हा केसांवरील एक चांगला उपाय आहे. त्यामुळे कड्याला घासून त्याचा रस काढा आणि त्याला टाळूवर लावून अर्धा तास तसेच राहा. त्यानंतर केस धुवून टाका हवे असल्यास तुम्ही या मध्ये एलोवेरा जेल देखील मिक्स करू शकता.

Image result for कोरफड (एलोवेरा)

कोरफड (एलोवेरा)
कोरफडीमुळे केस लांब आणि मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही केसांवर कोरफड लावू शकता आणि दोन ते तीन तासानंतर तुम्ही केस धुऊ शकता. आठवड्यात तीन चार वेळा असे केल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

Image result for जास्वंद

जास्वंदाचे फुल
जस्वानंदाचे फुले व पुदीना पाने एकत्र करून पाण्यात मिसळा आणि पेस्ट तयार करा. अर्ध्या तासासाठी ते केसांवर लावा आणि नंतर चांगले धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केस गळणे थांबते.

फेसबुक पेज लाईक करा –