Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

नवी दिल्ली : Beauty Tips | काही वर्षांपूर्वीपर्यंत स्कीन केयरमध्ये फेस सीरम फारसे लोकप्रिय नव्हते. फार कमी लोक त्याचा वापर करत असत. बहुतेक लोक फक्त क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग फॉलो करत असत, परंतु आता हेलदी आणि ग्लोईंग स्कीनसाठी स्कीन रूटीनमध्ये फेस सीरमने एक विशेष स्थान बनवले आहे, परंतु फेस सीरम वापरल्यानंतर अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून येतात. जसे की चेहर्‍यावर मुरुम येणे, मेकअप काळा पडणे. त्वचेनुसार सीरम न खरेदी केल्याने आणि सीरमचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने असे होते (Beauty Tips)

फेस सीरमबद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी, त्याचा योग्य वापर कसा करावा, सीरमचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा ते जाणून घेवूयात (Face Serum Mistakes)…

सीरमचा वापर कसा करावा?

1. जर तुम्ही पहिल्यांदा सीरम वापरत असाल तर प्रथम त्याची पॅच टेस्ट करा, तेव्हाच त्याचा वापर करा.

2. सीरम लावण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा, त्यानंतरच सीरम लावा.

3. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर लावताना आपण ते हातावर घासतो, पण सीरमच्या बाबतीत असे अजिबात करू नका. सीरम घासू नका, हळूवारपणे तुमच्या चेहर्‍यावर टॅब-टॅब करा आणि सीरमला स्वतःच त्वचेमध्ये अ‍ॅब्जॉर्ब होऊ द्या. सीरम असे लावल्याने त्वचा कधीही काळी होणार नाही आणि मेकअपही फ्लॉलेस दिसेल. (Beauty Tips)

4. सीरमच्या वापरानंतर, त्वचेला मॉइश्चरायझ आणि लॉक करा.

5. सीरम हाताऐवजी ड्रॉपरच्या मदतीने चेहर्‍यावर टाका. जास्त प्रमाणात सीरम वापरू नका फक्त 4-5 थेंब चेहर्‍यावर लावा. जास्त वापरामुळे ब्रेकआउटचा धोका होऊ शकतो.

फेस सीरम कसे खरेदी करावे?

1. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे प्रॉडक्टचा स्कीन इफेक्ट दिसण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा लागेल. जेणेकरुन त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहता येतील.

2 कोरड्या त्वचेसाठी hyaluronic अ‍ॅसिड सीरम वापरा. स्कीन एजिंग लक्षणांवर हे फायदेशीर आहे.

3. ऑयली आणि अ‍ॅक्ने स्कीनसाठी, रेटिनॉल आणि सॅलिसिलिक अ‍ॅसिडपासून बनवलेले सीरम वापरावे, कारण ते मुरुम आणि सुरकुत्या कमी करते.

4. डार्क स्पॉट दूर करण्यासाठी बी3 चे सिरम वापरा.

5. व्हिटॅमिन सी सीरम जे आजकाल खूप लोकप्रिय आहे. ते त्वचेचे कोलेजन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेची चमक कायम राहते.

Web Title :- Beauty Tips | face serum mistakes can be harmful for your mistakes precautions to be taken moisturizer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pankaja Munde | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी; पंकजा मुंडेंची नाराजी मावळणार?

Shinde Government | शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन आदेश जारी, थेट खात्यात रक्कम जमा होणार