एकही पैसा खर्च न करता ‘या’ सोप्या पद्धतीनं घरच्या घरीच तयार करा ‘जेल आयलायनर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मुलींना आयलायनर वापरायला खूप आवडतं. यात लिक्वीड, पेन्सिल आणि जेल आयलायनरही मुली वापर करतात. परंतु अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये केमिकल असतं जे आरोग्यासाठी घातक असतं. अशात आपण जेल आयलायनर घरीच कसा तयार हे पाहणार आहोत. खास बात अशी की, तुम्ही कलरफुल आयलायनर देखील तयार करू शकता. इतकंच नाही तर याचे फायदेही जाणून घेणार आहोत.

जेल आयलायनरसाठी साहित्य

– कोणत्याही रंगाचं आयशॅडो
– डोळ्यांचं प्रायमर
– खोबरेल तेल

असं तयार करा जेल आयलायनर

– एक काळ्या रंगाचं आयलायनर घेऊन कमी प्रमणात एका लहान कंटेनरमध्ये ठेवा.
– यात डोळ्यांचं प्रायमर टाकून नीट मिश्रण तयार करा.
– यात खोबरेल तेलाचे काही थेंब टाका.
– आता हे मिश्रण नीट एकजिन्सी झालं आहे याची खात्री करा.
– तुमचं जेल आयलायनर तयार आहे.

‘हे’ आहेत फायदे

– सोप्या पद्धतीनं तयार होतं.
– कलरमध्येही तयार करू शकता
– केमिकल फ्री
– स्मूद लुक देतं.
– डोळ्यांचं सौंदर्य वाढतं.
– 7-8 तास सहज टिकतं.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

– जेल आयलायनकर तयार करताना जरा लुज आयशॅडोचा वापर करा
– जेल आयलायनकर तयार करताना स्वच्छा प्रायमरचा वापर करा
– जेल आयलायनकर तयार करताना खोबरेल तेलाऐवजी व्हॅसलिनचाही वापर करू शकता.
– जेल आयलायनकर तयार करताना मॅट आयशॅडोचा वापर करा जेणेकरून शिमरी इफेक्ट कमी होतील.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळं काही पदार्थ काहींच्या त्वचेला सूट करतात तर काहींना नाही.