Beauty Tips | केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारींवर गुणकारी आहे बेलाचे पान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Beauty Tips | महादेवाचे आवडनारे पान म्हणजे बेल. पण बेल ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. विविध जुनाट आजारांवर बेलाच्या पानांचा काढा अतिशय प्रभावी ठरतो. केवळ पानेच नाही तर बेलाचे फळ आणि खोड यांचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदेही आहेत. अँण्टी ऑक्सिडंट्स (Antioxidants) सर्वात जास्त प्रमाण बिल्वपत्रांमध्ये (Bilva Patra) असतात. त्यामुळे कॅन्सरचा (Cancer) धोका ही बिल्वपत्रा (Bilva Patra) मुळे कमी होतो. तसेच सौंदर्य खुलविण्यासाठी (Beauty Tips) आणि एजिंग इफेक्ट (Aging effect) कमी करण्यासाठी बेलपत्र उपयोगी ठरते.

बेलाच्या पानांमुळे बहरते सौंदर्य
केसांचे आरोग्य (Hair health) सुधारण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक बेलपानांमध्ये असते. या पानांमध्ये केसांसाठी उपयुक्त ठरणारे बीटा कॅरेटीन व थायमीन, प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन्स ए, बी आणि सी तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

त्वचा मुलायम आणि नितळ होते
बेलपत्रांचा लेप तर त्वचेला मुलायम करून नितळ सौंदर्य मिळवून देतो. हा लेप बनविण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम आपण बेलाची पाने घ्या. ती पाने मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. साधारण दोन चमचे बेलाच्या पानांचा रस असेल तर त्यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण एकजीव करा आणि चेहऱ्यावर त्याचा लेप लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर आपला चेहरा तजेलदार होईल. या उपायाने फोड कमी होऊन चेहऱ्यावरील डाग देखील जातात.

 

केसांसाठीही होतो बेलाचा उपयोग

केसांची चांगली वाढ होण्यासाठी बेलाच्या पानांचा उपयोग होतो. यासाठी तिळाच्या तेलात बेलफळाची साले आणि थोडा कापूर घालावा. हे तेल गरम करून घ्यावे. हे तेल केसांना लावावे. दररोज एक बेलाचे पान खाल्ले तर केस गळणे कमी होईल. केसांचे आरोग्य सुधारणयासाठी बेलपानांचा रस केसांना लावावा. केस धुण्याआधी 20 ते 25 मिनिटे बेलपानांचा रस केसांना लावावा आणि त्यानंतर गरम पाण्याने केस धुवून टाकावेत.

बेलाच्या पानांचा असाही उपयोग
लिव्हरसाठी (Liver) बेलाची पाने फायदेशीर असतात, बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाचे दुखणे तसेच अपचनासंबंधी सर्वच तक्रारी कमी होतात.
मधुमेहींना साखर नियंत्रित ठेवण्यासाठी बेलफळाचे चुर्ण खाण्याचा सल्ला दिला जातो.
व्हायरल इन्फेक्शनमुळे (Viral infections) ताप आल्यास बेलाची पाने ग्लासभर पाण्यात उकळावीत.
उकळून उकळून पाणी निम्मे झाले की, ते गाळून घ्यावे आणि गरमगरम पाणी प्यावे.
या उपायामुळे शरीरातील उष्णताही कमी होते.

Web Title :- beauty tips uses bilva patra means betel leaf

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी आणि वारजे ते शिवणे नदी काठावरून उड्डाणपुल ! पुणे महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

Mumbai High Court | राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला न्यायालयाने दिली स्थगिती

CM Uddhav Thackeray | नाशिकमध्ये CM उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच विनामास्क जनतेला केलं संबोधित