‘वर्किंग वुमन’ असाल तर ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, नाही तर लवकरच दिसाल ‘म्हाताऱ्या’ ! जाणून घ्या 5 महत्त्वाच्या टीप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकदा वर्किंग वुमन्सना कामाच्या घाईत स्वत:च्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेता येत नाही. त्यामुळं त्या डल दिसतात. आज आपण वर्किंग वुमन्ससाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) डीप क्लिनिंग – आठवड्यातू किमान 2 वेळा चेहरा डीप क्लीन होणं गरजेचं आहे. यासाठी स्क्रबचाही वापर करू शकता. महिन्यातून एकदा फेशियल करा. यामुळं पिंपल्सची समस्याही दूर होण्यास मदत होईल.

2) फेस मास्क शीट्स – याचा फायदा हा आहे की, कमी वेळात त्वचेला पोषण मिळतं. बाजारात अनेक प्रकारचे मास्क आहेत. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फेस मास्क वापरू शकतात. रोज 10 मिनिटांसाठी याचा वापर केलानं चेहऱ्यावर ग्लो येईल.

3) फेशियल स्प्रे – यामुळं त्वचेत ओलावा राहतो. जेणेकरून त्वचा कोरडी पडत नाही. यामुळं सुरकुत्या आणि पॅचेसची समस्याही दूर होते.

4) हँड क्रिम – हातांच्या त्वचेचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. वर्किंग वुमन्सनं कायमच हँड क्रिम कॅरी करायला हवी. दिवसातून 3-4 वेळा याचा वापर करायला हवा.

5) लिप बाम – लिप बामनं ओठांवर कलरही दिसतो आणि ओठ हायड्रेट आणि सॉफ्ट होतात. याशिवाय जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावाल तेव्हा लिप बाममुळं ती पॅची वाटत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळं काही पदार्थ काहींच्या त्वचेला सूट करतात तर काहींना नाही.