भारतात ८० हजार कोटींचा ब्युटी आणि फिटनेसचा व्यवसाय ; ७० लाखांहून अधिक जणांना मिळणार नोकरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौशल्यविकास मंत्री नाथ पांडेय यांनी वीएलसीसी इंस्टीट्युट ऑफ ब्युटी अॅन्ड न्युट्रिशनच्या १८ व्या दिक्षांत समारंभात संबोधित करताना सांगितले की भारतात ब्युटी आणि फिटनेस या व्यवसाय ८०,००० कोटी रुपयांचा आहे आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. ते म्हणाले की सौंदर्य आणि आरोग्य केंद्रात युवकांना याचे ज्ञान देणे म्हणजे महिला सशक्तीकरणाचे एक महत्वाचे साधन ठरेल. या प्रशिक्षणानंतर विद्यार्थी मायक्रो यूनिट्स डेवलपमेंट अॅन्ड रिफाइनांस एजन्सी (MUDRA) बँकांकडून सहज कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरु करु शकतात आणि रोजगाराच्या संधी निर्माण करु शकतात.

येणाऱ्या काळात ७० लाख पेक्षा आधिक कौशल्य पुर्ण व्यक्तींची गरज –
पांडेय यांनी सांगितले की, वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला भविष्यात ७० लाखापेक्षा आधिक कौशल्य पुर्ण लोकांची आवश्यकता आहे. ते म्हणाले की भारतात ६२% आधिक युवक आहेत आणि पंतप्रधान मोदींचे व्हिजन भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हे आहे. १५ जुलै २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल विकास मिशन (स्कील इंडिया) ने कायम चांगली प्रगती केली आहे.

१ कोटी पेक्षा आधिक युवकांना प्रशिक्षण –
ते असेही म्हणाले की, विविध योजनांच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी जवळपास १ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्रालयने देशभरात अनेक जिल्हात पंतप्रधान कौशल्य केंद्र स्थापन केले आहे. ७१७ जिल्हात आणि ५४३ लोकसभा क्षेत्रात ८३७ केंद्र स्थापन केली आहेत. म्हणजेच पीएमकेकेेचे ६१० केंद्र आधीपासूनच स्थापन करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त

‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सावधान ! सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार

जाणून घ्या : ‘कडुलिंबाच्या’ पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे

स्किनच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्वरित परिणाम देणारी ‘कॉफी’