‘बेबो’ करीनानं विचारलं – ‘कधी वन नाईट स्टँड केलंय का ?’ सारा अली खाननं दिलं ‘असं’ उत्तर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सारा अली खान कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. पुन्हा एकदा सारा चर्चेत आली आहे. साराचा एक जुना किस्सा समोर आला आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. हा किस्सा बॉलिवूड स्टार करीना कपूरचा शो व्हॉट वुमेन वॉन्ट या शोमधील आहे. करीना कपूर ही साराची सावत्र आई जरी असली तरी दोघींमध्ये खूप चांगली मैत्री देखील आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात वन स्टँडबद्दल प्रश्न विचारला आहे. यावेळी सारानं अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे.

करीनानं साराला विचारलं की, कधी प्रियकराला नॉटी जोक्स पाठवतेस का. या प्रश्नाचं उत्तर देताना सारा काहीशी लाजताना दिसली. पुढे बोलताना करीना म्हणाली, तसं तर मला हा प्रश्न विचारू वाटत नाहीये परंतु आपण सगळे ग्लोबल विचार करणारे आहोत तर विाचरते आहे. तू कधी वन नाईट स्टँड केलंय का. वन नाईट स्टँडचा सरळ अर्थ आहे की, एखाद्यासोबत रात्र घालवण्यासारखं आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली की, मी असं कधी केलं नाही. यानंतर करीनानं देखील सुटकेचा निश्वास टाकला.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like