‘लॉकडाऊन’मध्ये ‘बेबो’ करीनाला सतावतेय समुद्रकिनाऱ्याची आठवण ! ‘हॉट’ बिकीनी फोटो शेअर करत म्हणाली – ‘मला परत घेऊन चल’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून घरातच आहे. सध्या ती आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशात करीना कपूरनंही आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. फोटो करीना रेड बिकीनीत दिसत आहे. तिच्या सोबत सैफ आणि तैमूरही आहेत.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका बीचवरचा आहे. यात ती तिचा लाडका तैमूर आणि पती सैफ अली खानही दिसत आहे. फोटोत दिसतंय की, करीनानं हॉट रेड बिकीनी घातली आहे. फोटोला तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटो शेअर करताना करीना म्हणते, “मी समुद्र किनारऱ्याची स्वप्ने नाही पहात. तुम्ही पहाताय. मला पुन्हा घेऊन चल” असं ती म्हणाली आहे. यावरून कळत आहे की, तिला समुद्रकिनाऱ्याची आठवण येत आहे पुन्हा तिथे जावंसं वाटत आहे.

या फोटोत सैफही शर्टलेस दिसत आहे. तैमूरही फूड एन्जॉय करताना दिसत आहे. करीना मात्र रेड बिकीनीत खूप हॉट दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. कोणी तिला क्युट तर कोणी हॉट म्हटलं आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

https://www.instagram.com/p/B8v4FNChtCe/

https://www.instagram.com/p/B-wa9RZAaXF/

https://www.instagram.com/p/B-wOKXzh2hS/

https://www.instagram.com/p/B-t0uZUhY1Y/

https://www.instagram.com/p/B-pYvBcBRAb/

https://www.instagram.com/p/B-gqcTuh_ZO/

https://www.instagram.com/p/B-gbtpWBQfD/

https://www.instagram.com/p/B-eI0TMhtWN/

https://www.instagram.com/p/B-KCFfKBPpU/

https://www.instagram.com/p/B-tq_BFHgje/

https://www.instagram.com/p/B-soWFFjWO4/