‘बेबो’ करीनानं घातले ‘सूर्य नमस्कार’ ! व्हिडीओ झाला ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार करीना कपूर एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओत करीना कपूर एक्सरसाईज करताना दिसत आहे. करीनाचा हा व्हिडीओ एक थ्रोबॅक व्हिडीओ आहे तरीही त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

करीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. करीनाच्या या व्हिडीओत दिसत आहे की, ती यात सूर्य नमस्कार घालत आहे. करीनाचा हा व्हिडीओ जुना आहे तरीही हा व्हिडीओ चात्यांना प्रेरणा देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAIGBAmFoax/?utm_source=ig_embed

करीना कपूर या व्हिडीओत तिची टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. तिचा उत्साह मात्र साऱ्यांनाच आवडला आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. लॉकडाऊनमध्ये ज्यांना वर्कआऊट करायचं आहे पण कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा व्हिडीओ उपयोगी आहे.

https://www.instagram.com/p/B_wt27xFixK/?utm_source=ig_embed

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे असं सांगण्यात येत आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.