‘बेबो’ करीनानं सासूला विचारला बिकीनीचा ‘किस्सा’, शर्मिला टागोर त्रासून म्हणाली… (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आपल्या मासूम इमेजसाठी ओळखली जाते. शर्मिल बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री होती जिनं इवनिंग इन पॅरीस या तिच्या सिनेमात बिकीनी घातली होती. तिनं एक बिकीनी फोटोशुटही केलं होतं जे त्या काळी खूप चर्चेत राहिलं होतं. आता शर्मिला टागोरची सून करीना कपूर हिनं तिला याबाबत प्रश्न विचारला आहे ज्यामुळं हा विषय चर्चेत आला आहे. करीनाच्या तोंडून बिकीनी शब्द ऐकताच शर्मिला काहीशी वैतागते काहीशी नाराज होतं. तिचा सूरही थोडा संतापल्या सारखा वाटतो.

करीनाचा रिडिओ शो व्हॉट वुमेन वॉन्ट च्या नव्या सीजनमध्ये तिची पहिली गेस्ट शर्मिला टागोर होती. यावेळी करीनानं तिला बिकीनी बद्दल प्रश्न विचारला एवढ्यात शर्मिला तिला तोडत म्हणाली, “मला नाही वाटत की, मी यावर कधीच मात करणार नाही. पूर्ण इतिहास फक्त याचबद्दल लहिला जाईल की, शर्मिला टागोर आणि तिची बिकीनी.”

https://youtu.be/f6QDsDETB7w

यावर करीनानं लगेच तिची स्तुती केली. करीना म्हणाली, “मला वाटतं की ही आयकॉनिक मुमेंट होती. आमच्या जनरेशनची लोकं असं पाहतात की, ओ माय गॉड कोणी बिकीनीत एवढं सुंदर दिसतं.”

करीनानं विचारलं की, त्यावेळी लोकांची रिअ‍ॅक्शन कशी होती. कारण त्यावेळी तुमचं लग्न होणार होतं. यावर शर्मिला म्हणाली, “मी लंडनहून परत आले होते. तोवर हे फिल्मफेअर मॅगेझीनमध्ये छापून आलं होतं. बरं झालं तेव्ह सोशल मीडिया नव्हतं. त्यावेळी याची खूप चर्चा झाली. मला मुक्ती सामंत (निर्माता-दिग्दर्शक) यांनी कॉल केला. त्यांनी मला भेटायला बोलावलं. ते म्हणाले, “तुला माहितीये का तू काय केलं आहेस. हे सगळं तुला सुट नाही करत. हे खूप चुकीचं आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. मला वाटतं की, मी तेव्हा चांगली दिसत होते.”

पुढे बोलताना शर्मिला म्हणते, “ते मला म्हणाले, हिरोईन्स असं करत नाहीत. आपल्याला हे सुधारावं लागेल. तुझं करिअर संपेल. नंतर मी वैतागून टायगर (मंसूर अली खान पतौडी)ला टेलिग्राम केलं. तो म्हणाला, यानं काही फरक पडत नाही. मला विश्वास आहे की, तू सुंदर दिसत आहेस. तो खूप सपोर्टीव होता.”