‘या’ कारणामुळे श्रद्धा कपूरने केले सर्व शुटिंग रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अभिनेत्री श्रद्धा कपूर सायना नेहवालवर आधारीत चित्रपटात काम करत आहे. दरम्यान तिला अचानक शुटिंग रद्द करावे लागले आहे. याआधी प्रसिद्ध झालेल्या तिच्या स्त्री या सिनेमाला चांगलंच यश मिळालं आहे. त्यानंतर येणाऱ्या तिच्या चित्रपटांविषयी तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला लागली आहे. श्रद्धाला डेंग्यू झाल्याने तिने सर्व शुटिंग रद्द केले आहे. परिणामी हा सिनेमा लटकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9334096b-c7bc-11e8-a867-d3ad835010fa’]

बऱ्याच दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने तिने २७ सप्टेंबर रोजी आपलं शुटिंग रद्द करून रक्त चाचण्या करून घेतल्यानंतर तिला डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले. हे समजल्यावर तिने तत्काळ सायनावरील चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या आठ दिवसातच थांबवले आणि आराम करायला सुरुवात केली आहे. मात्र श्रद्धा लवकरच सेटवर परत येईल असं सांगितलं जात आहे. भारत भूषण प्रॉडक्शन आणि अमोल गुप्ते यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा बनत आहे. दरम्यान, श्रद्धा आजारी असल्याने चाइल्ड आर्टिस्टबरोबरचं चित्रीकरण उरकून घेतलं जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या एमडी चंदा कोचर यांचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने या सिनेमाविषयी सांगितलं होतं. ‘या चित्रपटातील सायनाची भूमिका वठवण्यासाठी आतापर्यंत मी ४० बॅडमिंटन क्लासेस घेतले आहेत. हा खेळ फारच कठीण आहे. मात्र मी आनंद लुटत आहे. कोणत्याही खेळाडूच्या जीवनाचा अनुभव अद्भूत असतो. त्याचा त्याग, समर्पण, त्याला लागलेला मार आणि त्यातून मिळालेला विजय या सगळ्याच गोष्टी आनंददायी असतात’, असं तिने सांगितलं होतं. श्रद्धा आजारी असली तरी लवकरच आराम करून ती सेटवर परत येईल असेही सांगितले जात आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’beb1ea3a-c7bc-11e8-9a91-d5fb60268bdf’]

You might also like