म्हणून सपा-बसपा आघाडीत काँग्रेसला घेतले नाही

लखनऊ : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातुन दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग जातो असे म्हणले जाते. म्हणूनच उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर राष्ट्रीय राजकारणाची चांगलीच नजर असते. उत्तर प्रदेशात गत निवडणुकीत भाजपने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पार्टीला ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर बहुजन समाजवादी पार्टीला तर आपले खाते हि उघडता आले नाही. तर काँग्रेसला आपल्या पारंपरिक अमेठी आणि रायबरेली या दोन जागाच जिंकता आल्या. अशा पार्श्वभूमीवर मताचे विभाजन टाळण्यासाठी सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली आहे. २५ वर्षांपासूनच्या कटुतेला विसरून मायावती यांनी अखिलेश यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपण आपल्या आघाडीत काँग्रेसला का घेत नाही याचे उत्तर हि मायावतींनी दिले आहे.

पत्रकार परिषदेत मायावतींनी जागांचे वाटप जाहीर करण्या अगोदर आम्ही काँग्रेसला आपल्या आघाडीत का घेत नाही याचे उत्तर दिले. १९९६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या सोबत गेलो पण आम्हाला पराभव सोसावा लागला तर २०१७ साली समाजवादी पार्टी काँग्रेस सोबत गेली तर त्यांना हि पराभव सोसावा लागला. याचे कारण एकच आहे ते म्हणजे आम्हाला मतदान करू इच्छणारे मतदार आमच्या सोबत आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला मत देत नाहीत ते भाजपच्या उमेदवारांना मतदान देणे पसंत करतात म्हणून आम्ही काँग्रेसला आमच्या सोबत घेणे ताळले आहे असे मायावती यांनी म्हणले आहे. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या सोबत लढताना

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मायावती यांनी मोदींना आणि अमित शहा यांच्या गुरु शिष्याच्या जोडींला लक्ष करत त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. त्यात त्यांनी म्हणले के १९७७ साली जशी काँग्रेसची गाळण उडाली होती तशी गाळण या निवडणुकीत  भाजपची उडणार आहे असे मायावती यांनी म्हणले आहे. भाजपने आमची आघाडी तुटावी म्हणून अखिलेश यादव यांच्या मागे सीबीआय चौकशीची ससेमारी लावली अशी टीका मायावती यांनी भाजपवर केली.

असे असेल सपा-बसपा आघाडीचे जागा वाटप 

बहुजन समाज पार्टी -३८ जागी लढणार
समाजवादी पार्टी -३८ जागी लढणार
राष्ट्रीय लोक दल – १ जागी लढणार
निशाद पार्टी – १जागी लढणार
तर अमेठी येथून राहुल गांधी आणि रायबरेली येथून सोनिया गांधी यांच्या विरोधात सपा-बसपा आघाडी उमेदवार निवडणूक लढणार नाही.