पीएमपी आगार प्रमुख आणि चालक निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादावादीत हडपसर आगाराच्या आगार प्रमुखाने चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारले. याप्रकरणात पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने दोघांनाही आज (शुक्रवार) निलंबित केले. या दोघांची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही घटना हडपसर आगारमध्ये सोमवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी घडली होती.

जाहिरात

आगारप्रमुख नारायण करडे व चालक दिलीप पवार अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी हडपसर आगारामध्ये काही कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून नारायण करडे यांनी चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली. याची तक्रार चालकाने चालकाने केली आहे. तर संबंधित चालकाने मद्यप्राशन केल्याने ते घसरून पडले, असे आगारप्रमखांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे आगारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. या संपुर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने दोघांनाही सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

पुणे : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलचा खून करणाऱ्या आईल १० वर्षांची सक्तमजुरी

घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून तसेच सुरक्षा विभागाने दिलेल्या अहवालावरून दोघांनाही शनिवारपासून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे पीएमपीचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात