#Video : धावत्या कारमध्ये ‘FB Live’ करताना भीषण अपघात, दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव कारमध्ये फेसबूक लाइव्ह करीत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत. नागपूरवरून काटोलला जात असताना ही घटना घडली आहे. पंकेश चंद्रकांत पाटील (२७) व संकेत चंद्रकांत पाटील (२७, न्यू कैलासनगर बुद्ध विहाराजवळ) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या झायलो कारमध्ये एकूण ९ जण होते. सर्वजण काटोल परिसरात मित्राकडे पार्टीसाठी जात होते. त्याचवेळी चालक पंकेश हा फेसबूक लाइव्ह करीत होता. त्यावेळी त्याचे मित्र खाली कॉमेंटही करत होते. हातला शिवाराजवळ गाडी आल्यावर एकामागोमाग एक गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची झायलो कार अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. यात पंकेश व संकेत हे भाऊ जागीच ठार झाले. अपघात होईपर्यंत या घटनेचं फेसबुक लाईव्ह सुरुच होतं.

Geplaatst door Punkesh Patil's op Zondag 16 juni 2019

या अपघातात ७ जण जखमी असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर काटोल आणि नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like