बारामतीत सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामतीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

संजय भानुदास शिंदे (५०, तांदुळवाडी रोड, बारामती) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तर कल्पना दिलीप जगताप, निलेश दिलीप जगताप, रोहिणी उर्फ रेणूका सुनील गोरे, सुरज दिलीप जगताप, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर इतर दोघे फरार आहेत.

संजय शिंदे यांना अटक केलेल्या ५ जणांनी ७४ हजार रुपये व्याजाने दिले होते. त्यापोटी व्याजासह ३ लाख रुपयांची मागणी करत मानसिक त्रास दिला. तसेच फरार असलेल्या दोघांनी त्यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. परंतु त्यांनी पैसे परत केले नाहीत. त्यांच्या त्रासाला कंटाळून शिंदे यांनी बारामती येथील कालव्यालगतच्या झुडपात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत.