खुशखबर ! 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आणखी किती कमी होणार किंमत, वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज सलग चौथ्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुरुवारी (ता. १९) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची वायदा किंमत ०. ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. दरम्यान, ५०,१८० रुपये प्रति तोळा झाली आहे, तर चांदीची वायदा किंमत ०. ८ टक्केने उतरले आहेत. आज सोन्याचे भाव जवळपास ४५० रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी ७१८ रुपयांनी कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५६,२०० रुपये प्रति तोळा असा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत यामध्ये साधारण ६००० रुपयांची घसरण झाली आहे. घसरणीनंतरचा भाव ६२,०४३ रुपये प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण

कोव्हिड-19 व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine) लवकरच उपलब्ध होईल अशी अपॆक्षा आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव ०. १ टक्क्याने कमी होऊन १,८६९. ८६ डॉलर प्रति औंस झाले आहेत. याठिकाणी चांदीचे भाव ०. ३ टक्क्याने कमी होऊन २४. २४ डॉलर प्रति औंस झाले आहेत. डॉलरने सोन्यावर दबाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत.

विश्लेषकांच्या मते, अनेक कारणांमुळे सोन्याचे दर याच रेंजमध्ये आहेत. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे. सोन्याचे भाव १, ८५० डॉलर प्रति औंसवर पोहोचून देखील ते १,९०० डॉलरच्या स्तरापर्यंत पोहोचले नाही.

Pfizer ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे व्हॅक्सिन ९५ टक्के प्रभावी आहे. या लशीने अमेरिका फूड अँड ड्रग अॅमिनिस्ट्रेशन (USFDA) द्वारे आपातकालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे. Pfizer आता येणाऱ्या काही दिवसात अमेरिका आणि युरोपियन नियामकांकडून मान्यता मिळवेल. डॉलर इंडेक्समध्ये ०. ६ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इतर चलन असणाऱ्यांसाठी सोने महागलं आहे.

ETF मध्ये गुंतवणूकदारांचा कमी रस

बुधवारी एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग ०. ६० टक्क्यांनी घसरून १,२१९ टन झाली. हे जगातील सर्वात मोठं गोल्ड ईटीएफ आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Gold ETF) गुंतवणूकदारांनीही कमी रस दाखवला आहे. आहे.

सोनं 50 हजारांपेक्षा कमी होणार

तज्ज्ञांच्या मते, चांदीचे दर ६२,००० रुपये प्रति किलो पेक्षा कमी तर सोन्याचे भाव ५०,००० रुपये प्रति तोळाहूनही खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ४९,५५० ची सपोर्ट लेव्हल पाहायला मिळू शकतं.